नव्या स्मार्ट मीटरची गती अधिक, ग्राहकांना ६०-७० टक्के अधिक रक्कम मोजावी लागणार
बुध दि . [प्रकाश राजेघाटगे]
महावितरण कंपनीने ग्राहकांकडीत विजेचे चालू मिटर काढून नव्या सार्ट मिटरची जोडणी सुरू केली आहे . या न०या स्मार्ट मिटरला गती आधिक असल्यामुळे ग्राहकांना ६०ते ७० टक्के अधिक रक्कम भरावी लागणार आहे . त्यामुळे कंपनीने नविन मीटर बसवण्यासाठी सक्ती केल्यास अदानीचा स्मार्ट मिटर फोडण्याचा इशारा सातारा जिल्हा शेतकरी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांनी दिला आहे .
जाधव पुढे म्हणाले की ,महावितरण कंपनीने राज्यभरातील ग्राहकांकडील विजेचे चालू मीटर काढून 'स्मार्ट मीटर' लावणे सुरू केले आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांनी या स्मार्ट मीटरला विरोध करायला सुरुवात केली असली, तरी कंपनीचे कर्मचारी चोरून लपून किंवा चुकीची माहिती देऊन हे मीटर लावत आहेत. ग्राहकांचा विरोध आणि महावितरण कंपनीचा आग्रह या दोन महत्त्वाच्या बाबींकडे सध्या कुणीही गांभीर्याने बघत नाही. वास्तवात या स्मार्ट मीटरची गती ही साध्या मीटरच्या तुलनेत ६० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे सिध्द झाले आहे. त्यामुळे ग्राहकांना सध्याच्या वीजबिला पेक्षा किमान ६० ते ७०% अधिक रक्कम मोजावी लागेल.
प्रशासन वीज गळती, वीजचोरी, अंतर्गत भ्रष्टाचार, भारनियमन या महत्त्वाच्या बाबींवर लक्ष्य केंद्रित करण्या ऐवजी विजेच्या मीटरवर काम करीत आहेत. सन २०१५ पासून राज्यात 'प्री-पेड मीटर' ची चर्चा सुरू झाली. ग्राहकांनी या मीटरला विरोध दर्शवायला सुरुवात करताच महावितरण कंपनीने राज्यातील विजेच्या एकूण नऊ लाख मीटरची तपासणी केली. यात सात लाख मीटर 'फॉल्टी' आढळून आल्याने राज्याच्या ऊर्जा मंत्रालयाने माघार घेत फेब्रुवारी २०१७ मध्ये 'प्री-पेड मीटर' लावले जाणार नसल्याचे स्पष्ट केले. जानेवारी २०२५ पासून या 'प्री-पेड मीटर' ला पर्याय म्हणून 'स्मार्ट मीटर' ची चर्चा सुरू झाली. अलीकडच्या काळात महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करीत स्मार्ट मीटर लावायला सुरुवात केली.
एक हजार वॅट क्षमतेचा बल्ब एक तास सुरू ठेवल्यास एक युनिट वीज वापरते, ही मीटरची अधिकृत गती महावितरण कंपनीने ठरवून दिली आहे. हा बल्ब अथवा उपकरणे यापेक्षा कमी किंवा अधिक विजेचा वापर करीत असल्यास त्या मीटरला फॉल्टी ठरविले जाते.
मध्यंतरी साधे आणि स्मार्ट अशा मीटरच्या गतीचे प्रात्यक्षिक महावितरणच्या अधिकाऱ्यांसमक्ष घेण्यात आले. विजेची सारखी उपकरणे दोन्ही मीटरला वेगवेगळी जोडून ती १० तास चालविण्यात आली. साध्या मीटरने या १० तासांतील विजेचा वापर २१९ युनिट दाखविला, तर स्मार्ट मीटर ने हाच वापर ४७९ युनिट दाखविला. यावरून स्मार्ट मीटरची गती ही साध्या मीटर पेक्षा किमान ६०% अधिक असल्याचे स्पष्ट झाले.
स्मार्ट मीटर संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान जुन्या व नवीन मीटरच्या उणिवा व गती, त्यातून वाढणारे न वापरलेल्या विजेची बिले, चांगले मीटर काढून स्मार्ट मीटर लावण्याची सक्ती या बाबी विचारात घेणे गरजेचे आहे. महावितरण कंपनीने या मीटरची सक्ती करू नये, ते ऐच्छिक असावे. वाटल्यास दोन्ही मीटर लाऊन कमी युनिट येईल, ते बिल ग्राहकांकडून घ्यावे. राज्यात २ कोटी ८५ लाखांपेक्षा अधिक वीज ग्राहक असून, ते सर्व महावितरण कंपनीला जोडले आहेत. या स्मार्ट मीटरची किंमत १२ हजार रुपये ठरविण्यात आली आहे. महावितरण कंपनी हे १२ हजार रुपये ग्राहकांकडूनच वीज बिलात अतिरिक्त रक्कम जोडून टप्प्याटप्प्याने वसूल करणार आहे. ही रक्कम ३४२ कोटी रुपयांपेक्षा अधिक असून, ती वीज बिला व्यतिरिक्त आहे.
सातारा जिल्ह्यात सक्तीने मीटर बसवण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात असून ग्रामीण भागात या कंपनीचे कर्मचारी येऊन कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता मीटर बसून जात आहेत या विषयावर शिवसेनेचा तीव्र विरोध असून संबंधित ग्राहकाची परवानगी न घेता कर्मचाऱ्यांनी दांडगावा करत मीटर बसवल्यास शिवसेना त्याच पद्धतीने उत्तर मिळेल संबंधित कर्मचारी नोडल एजन्सीचे आहेत मीटर बसवण्यास आल्यास त्यांना हाकलून लावा जीनियस कंपनीचे मीटर ज्या ग्राहकांना आतापर्यंत लावले आहेत त्यांना डबल बिल आले आहे असे निदर्शनास येत आहे सर्व विषयावर शिवसेनेचा तीव्र विरोध असून येणाऱ्या काळात संबंधित विभागाला घेराव घालण्यात येणार आहेत .
Social Plugin