नाशिक ,प्रतिनिधि ,अमन शेख,
पंचवटी येथील आयुर्वेद रुग्णालयाच्या औषध भांडार विभागातून अॅल्युमिनियमचे झाकण चोरणाऱ्या तीन संशयितांना २४ तासांच्या आत अटक करण्यात आली. मयूर जाधव (रा. हिरावाडी), जितेश उर्फ गुड्डू फसाळे, संदीप कनोजिया (रा. गणेशवाडी) अशी संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित हिरावाडी येथे असल्याची माहिती डीबी पथकाचे कुणाल पचलोरे यांना मिळाली. पथकाने ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील, संपत जाधव, महेश नांदुर्डीकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Social Plugin