नाशिक ,प्रतिनिधि ,अमन शेख ,
देवळा तालुक्यातील दहिवड व चिंचवे गावांच्या शिवावरील c पर्यटनासाठी आलेल्या मालेगाव येथील एक तरुण पाण्यात बुडून मृत्यू . सदर घटनेबाबत देवळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालेगाव येथील तीन तरुण चोरचावडी धबधब्यावर वर्षा पर्यटनासाठी आले होते. सदर ठिकाणी डोहामध्ये पोहण्याचा आनंद घेत असताना त्यातील एका तरुणाला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यामध्ये बुडाला त्याच्याबरोबर असलेल्या अन्य दोघा साथीतारांनी त्याला वाचविण्याचा भरपूर प्रयत्न केला मात्र तो तरुण वाचू शकला नाही. मोहम्मद अनस मोहम्मद इसाक (मालेगाव ) असे धबध्ब्याजवळील डोहात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
सदर घटनेबाबत देवळा पोलिसांना माहिती मिळतात पोलीस हवालदार नितीन बाराहाते, चव्हाण दादा हे घटनास्थळी दाखल झाले. मालेगाव येथील पट्टीच्या होणाऱ्या व्यक्तींना बोलावून बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यात आला. अथक प्रयत्नानंतर सदर व्यक्तीचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला त्या नंतर मृतदेह मालेगाव येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
चोर चावडी धबधब्यावर यापूर्वी देखील मागील काही वर्षांपूर्वी वडाळीभोई येथील तीन तरुण पाण्यात बुडून मृत पावले होते, त्यानंतर देखील छोट्या-मोठ्या घटना या ठिकाणी घडल्या होत्या तरी या ठिकाणी पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांनी व युवकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन देवळा पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे.
Social Plugin