Ticker

6/recent/ticker-posts

रवळा, जवळा, जामठी, येथे रानडुक्कर चा धुमाकूळ



सोयगाव :जामठी/प्रति/भारत जाधव 28/7/2025 सोमवार तालुक्यातील रवळा – जवळा – जामठी शिवरातील शेतकऱ्यांचे वन्यप्राणी रानडुकरांच्या कळपांनी मोठ्या प्रमाणात केळी पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे .वन विभागातर्फे तात्काळ पंचनामे नोंदवून शेतकऱ्यांना शासन नियमाप्रमाणे नुकसान भरपाईचे पैसे तात्काळ देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संभाजी पवार यांनी केली आहे.

रवळा,जवळा, जामठी व सावळदबारा या परिसरात वन्यप्राणी रान डुक्कर व निलगाय यांनी केळी , मक्का, कपाशी, सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमांणात नुकसान करण्यात येतं आहे. रवळा शिवारातील गट नंबर ७४ रवळा शिवार शेतकरी भोजराज गुलाबसिग पवार तसेच गट नंबर ९१ रवळा शिवार शेतकरी चरणसिंग पवार यांच्या शेती शिवारात जंगली प्राण्यांनी केळीचे अतोनात नुकसान केले आहे. यापूर्वी नुकसान ग्रस्त शेतकर्यांचा पिकानाचे गेल्या सात – आठ महिन्यापूर्वी वन विभागाने पंचनामे करूनही अद्याप नुकसान भरपाई दिली नाही.शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे तात्काळ देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संभाजी पवार यांनी केली आहे.