Ticker

6/recent/ticker-posts

हदगाव ते भाटेगाव (उमरी)बस सेवा चालू



         हदगाव :प्रतिनिधी[देवानंद महाजन] 

हदगाव तालुक्यातील भाटेगाव ते उमरी बस सेवा चालू करण्यात यावी अशी मागणी मा. जिल्हा वाहतूक नियंत्रक व राणी लक्ष्मीबाई विद्यालय निवघा येथील मुख्याध्यापकांनी हदगाव आगार प्रमुख यांच्याकडे केली त्यामुळे  बस सेवा 2 जुलै पासून चालू झाली  आहे. तालुक्याच्या सर्वात टोकाचे गाव म्हणजे भाटेगाव . येथील शाळकरी विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी येऊन शिक्षण घेण्यासाठी  विविध अडचणी निर्माण होत होत्या. या ठिकाणी गेली अनेक वर्षापासून बस सेवा खंडित होती. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते . भाटेगाव येथील  भूमिपुत्र मा. जिल्हा वाहतूक नियंत्रक दिलीप नागोराव शिंदे व राणी लक्ष्मीबाई विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष मगर यांनी हदगाव आगर प्रमुखांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधेसाठी बस सेवा चालू करण्याची विनंती निवेदनाद्वारे दि.24 जून रोजी हदगाव आगार प्रमुख यांच्याकडे केली. बस सेवा विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना देण्याची आवश्यकता असल्याचे आगाप्रमुखाच्या लक्षात  आले. भाटेगाव उमरी ते हदगाव बस सेवा चालू झाली असून दररोज 40 ते 50 प्रवासी प्रवास करत आहेत. सर्व गावकऱ्यांनी मा. जिल्हा वाहतूक नियंत्रक शिंदे तसेच हदगाव आगारप्रमुखांचे आभार मानले.