Ticker

6/recent/ticker-posts

प्रा. किरण कुंभार यांना पीएच.डी. पदवी प्रदान



बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

पुसेगाव येथील, रयत शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयातील इतिहास विभागाचे सहायक प्राध्यापक  किरण गणपत कुंभार यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी "सातारा जिल्ह्याचे भारतीय युद्धातील योगदान (१९६२ ते १९९९ ते ) या विषयावरील सखोल संशोधनासाठी पीएच.डी. पदवी बहाल केली आहे

या संशोधनामध्ये त्यांनी १९६२ च्या भारत-चीन युद्धापासून ते  १९९९च्या कारगिल युद्धापर्यंतच्या काळात सातारा जिल्ह्यातील सैनिकांचे तसेच सामान्य नागरिकांचे युद्धकालीन योगदान अभ्यासले आहे. या संशोधनासाठी प्रो.डॉ डी. बी. मासाळ यांनी त्यांना मार्गदर्शन केले.या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा.चंद्रकांत दळवी साहेब, सचिव मा.विकास देशमुख, सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, सहसचिव (ऑडिट) प्राचार्य डॉ राजेंद्र मोरे, तसेच सैनिक सहकारी बँकेचे मार्गदर्शक कॅप्टन उदाजीराव निकम, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे प्रमुख ले.कर्नल सतेश डी. हंगे (निवृत्त) ब्रिगेडीअर सुधीर सावंत,( निवृत्त)शिवाजी विद्यापीठ  कोल्हापूर इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ.अवनिश पाटील यांनी प्रा. किरण कुंभार यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे.

याचप्रमाणे कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर. पी.भोसले, रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद,प्रा.डॉ.संजय क्षीरसागर, डॉ.अनिल जगताप, सर्व प्राध्यापक ,प्रशासकीय सेवक, तसेच सर्व आजी-माजी सैनिक बांधवांनीही त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन  केले आहे.