अंबड बस आगारातील कर्मचाऱ्यांना सौजन्यपूर्ण सेवा प्रदान करण्याची शिकवण देणे गरजेचे
अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीची ओळख आहे."गाव तिथे एसटीची" सेवा कौतुकास्पद ठरते. सर्वांची आवडती"लालपरीसी"जनतेचे अत्यंत जिव्हाळ्याचे आपुलकीचे नाते आहे. परंतु अंबड आगाराच्या उर्मट,मुजोर वाहकांच्या (कंडक्टर)बेजबाबदारपणाचा प्रवाशांना नाहकत्रास सहन करावा लागत आहे.अंबड आगारातील बहुतांशी कंडक्टर विशेष करून महिला कंडक्टरला"प्रवाशांच्या सेवेसाठी"या एसटीच्या ब्रीद वाक्याचा विसर पडला असल्याचे दिसून येते.प्रवाशांना सौजन्यपूर्ण,नम्रतापूर्वक सेवा प्रदान करणे अत्यंत आवश्यक असताना कंडक्टरच्या उर्मट,मुजरपणाचा प्रवाशांना वारंवार कटू अनुभव येत मनस्ताप सहन करावा लागत आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सौजन्य सप्ताहाचे आयोजन फक्त कागदोपत्री व प्रसिद्धी पुरतेच करत असल्याचे अंबड आगाराच्या बेजबाबदार,मुजोर,उर्मट सेवेवरून म्हणता येऊ शकते.वयस्कर व्यक्ती,विद्यार्थी,महिला प्रवाशांशी देखील अंबड आगाराचे वाहक सौजन्य पूर्ण व्यवहार करत नाही तर एसटी आपल्या स्वतःच्या घरची जहागीरदारी असल्याच्या तोऱ्यात व प्रवाशांना दिल्या मिळणाऱ्या विविध सवलतीचा लाभ आपल्या मुळेच मिळत असल्याचे वाहकांच्या बेजबाबदार कर्तव्यावरून दिसून येते.
"हात दाखवा गाडी थांबवा","प्रवाशांच्या सेवेसाठी" या ओळी फक्त जाहिरात बाजीपुरत्या मर्यादित असल्याचे अंबड आहाराकडे पाहून म्हणता येईल अनेक वेळा प्रवाशाचे प्रवासादरम्यान तिकिटाचे राहिलेले शिल्लक पैसे वाहकांना परत मागितल्यास त्यांचा पारा चढतो,नाविलाजाणे प्रवासी निमुटपणे आपल्या निर्धारित स्थळी उतरत चालता होतो.याबाबतीत अंबड आगारातील महिला कंडक्टर आघाडीवर असल्याचे दिसून येते.
अंबड आगाराच्या या उर्मट,मुजोर,बेसिस्त सेवेला लगाम लावत सौजन्यपूर्ण सेवा प्रदान करण्याबाबत वरिष्ठांनी सौजन सप्ताहाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करणे गरजेचे असल्याची मागणी प्रवासी वर्गातून मोठ्या प्रमाणात होत आहे.अंबड आगारांच्या कर्मचाऱ्यांमुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेची प्रतिमा जनसामान्यांच्या मनात मलिन न होता सौजन्य पूर्ण सेवा प्रदान करणे अत्यंत गरजेचे आहे तेव्हाच खऱ्या अर्थाने "प्रवाशांच्या सेवेसाठी" हे ब्रीद वाक्य सार्थकी ठरेल नसता अंबड आगाराच्या उर्मट मुजोर वाहकांमुळे "प्रवाशांच्या मनस्तापासाठी" म्हणण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे.
Social Plugin