शालेय विद्यार्थ्यांना बाहेर काढतांना गावकरी.जो पुल महोत्वाचा तोचं केला नाही!.
तालुका प्रतिनिधी मारोती गाडगे/गेवराई
गेवराई (बीड):- जोरदार पाऊस पडल्याने कटचिंचोली ते दैठण रस्ता बंद झाला आहे.दैठण येथे शिकण्यासाठी गेल्याले विद्यार्थी मध्ये चं अडकले!पावसळा सुरू होवून जवळपास दोन महिने झाले दोन महिन्यांपासून दिनांक २६ जुलै शनिवार रोजी झालेल्या पावसामुळे कटचिंचोली ते दैठण रोडवरती गायरानाचा ओढा आहे.त्या ओढ्याला जवळपास हिंगणगाव, जळगाव पासून पाणी येते!त्यामुळे कटचिंचोली ते दैठण रस्ता बंद होतो.स्वातंत्र्य पासून कटचिंचोली गावाला एक वेळ रस्ता झालता तो वाळुमाफियांनी खड्डे करून खराब केला होता.त्यानंतर वर्षं २० २४/२०२५ मोठ्या रकमेने रस्ता झाला. कटचिंचोली चा रस्त्याचा प्रश्न मात्र संपला!
पण जो कटचिंचोली ते दैठण रस्तावरचा मेन पुलंच बांधला नाही!तो म्हणजे गायरानाचा पुल.ज्या पुलाचा मोठा प्रश्न होता गोदावरी नदीला जर पुर आला की कटचिंचोली ते दैठण रस्ता बंद होतो.पुर तर सोडा पण पहिल्या चं पावसाने रस्ता बंद झाला.कटचिंचोली ते दैठण रस्त्यावरच्या गायराणाच्या पुलाचा मोठा प्रश्न आहे.कटचिंचोली या गावात जर येखांद डिलेवारी पेशंट किंवा येखांद अपघाती पेशंट आसेल तर ते गेवराई तालुका सरकारी दवाखान्यापर्येत पोहोचुशकणार नाही!
करण की.थोडा भी पाउस आला की कटचिंचोली ते दैठण रस्ता बंद होतो.रोड बनवताना सर्व पुलं नविन बांधले पन गायरानाचा पुल मात्र जुनाच ठेवला साधा उकरुन दुरुस्ती पन केला नाही. कन्स्ट्रक्शन ला विचारलं आसता इंजिनिअर साहेब म्हणाले 'हा पुल आमच्या बजेट मध्ये नाही त्याला बजेट नाही.गरज नसताना त्याच्या जवळ चं पुल बांधला.पन गायरानाचा पुल तसाच ठेवला.
ज्या वेळेस रस्त्याची मोजणी,पाहनी करतांना मेन 'गायरानाचा 'चं पुल गहाळ केला,तो मोजनीत घेतला नाही.तो पुल कधी मंजुर होईल,कोन मंजुर करेण,का? रस्ता तर झाला!पन पुलामुळे पावसाळ्यात कोणाला जीव गमावा लागेल.असा गावकऱ्यांना विचार पडला आहे.
का? गेवराई चे आमदार मा.आमदार विजय सिंह साहेब पंडित हे हा पुल मंजूर करुन आणतील का? आणि तो पुल मंजूर करुन आणावा व गाय रानाच्या पुलाचे काम पूर्ण करु द्यावे.आसे गावात चर्चा आहे.मा आमदार आदरणीय. अमरसिंह साहेब पंडित यांनी कटचिंचोली ते दैठण रस्त्यावरच्या पुलाची पाहणी करून तो पुल मंजूर करुन आणावा अशी मागणी गावकरी करीत आहेत.
Social Plugin