Ticker

6/recent/ticker-posts

आमदार लंघे यांचे हस्ते पूर्ण झालेल्या कामांचे लोकर्पण



रांजणगांवदेवी (प्रतिनिधी अशोक पंडित ) 

आ लंघे यांनी आमदार पदाचा कार्यभार स्विकारल्या नंतर तालुक्यामध्ये ठिक ठिकाणी निरनिराळ्या विकास कामाचे उद्घाटन केले व उद्घाटन करतांनींच काम वेळेत पूर्ण करण्याचा शब्द मतदारांना दिला त्याच प्रमाणे रांजणगांवदेवी येथे आमदारांनी सिद्धेश्वर मंदिरासाठी पेव्हिंग ब्लॉक  गणपती मंदिर रस्ता खडीकरण करणे जाहीर केले व कामाची पूर्तता करून आज शनिवार दि २६ / ०७ /२०२५ रोजी पूर्ण कामाचे लोकार्पन केले व मतदार संघातील निरनिराळे प्रश्न समजून घेऊन जनतेचे प्रश्न सोडविण्यास सर्वपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आज प्रथमतः वै हभप बन्सी महाराज तांबे माध्यमिक विद्यालयात गावातील भूमिपुत्र व मुंबई येथे नेव्हीमध्ये प्रबंधक पदावर कार्यरत असलेले राजेंद्रजी लोखंडे साहेब यांनी स्वनिधीतून दिलेल्या   विज्ञानाच्या प्रयोगासाठी सुसज्ज प्रयोगशाळा खोलीचे उद्घाटन करण्यात आले 

उद्घाटन प्रसंगी आ. लंघे त्यांनी लोखंडे साहेब यांचे भरभरून कौतुक केले त्यांनी आपल्या भाषणात शाळेतील विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्याचे काम शिक्षक करतो परंतू विदयार्थ्यांच्या व शाळेच्या निरनिराळ्या अडचणी असतात या अडचणी सोडविण्यासाठी समाजातील गुणवान व धनवान व्यक्तींनी पुढे आल्यास व अडचणी सोडविण्यासाठी मदत केल्यास  विद्यार्थी चांगले शिक्षण घेऊन ज्ञानाची उंची वाढवतात तेव्हा गावाचे शाळेचे पालकांचे नाव मोठे होते लोखंडे साहेबांनी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी केलेले हे काम हे अतिशय योग्य आहे या प्रसंगी अहमदनगर डिस्ट्रीक माध्य शिक्षक  सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन आप्पासाहेब शिंदे संचालक सुनिल दानवे सर  ज्ञानेश्वर काळे सर उद्धवराव सोनवणे सर सरपंच सोपान लोखंडे जालींदर वाकचौरे अंकुशराव काळे विश्वासराव काळे संभाजीराजे लोंढे संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मणराव राशिनकर सचिव रामदास नजन  अशोक पंडित बाबासाहेब पेहेरे खोसे सर उंदरे ॲड देवदान जावळे भाऊसो राहूल शिंदे विनायक चौधरी नितिन कापसे   सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पालक आदि बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राजेंद्र लोखंडे साहेब होते मुख्या पंडीत  सिद्धेश्वर मंदिर येथे पेव्हिंग ब्लॉकचे लोकार्पन करून पुढील कार्यक्रम पार पडला