शिरुर ग्रामीण प्रतिनीधी - ( शैलेश जाधव)
शिरूर | दिनांक १६ जुलै २०२५
शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने "गणराया ॲवार्ड २०२४" चे वितरण सोहळा आज पंचायत समितीच्या मीटिंग हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी मा. प्रशांत ढोले, तसेच पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, हे प्रमुख उपस्थित होते.या कार्यक्रमानिमित्त सन २०२५ च्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन देखील करण्यात आले होते.
पुरस्कार विजेते मंडळे पुढीलप्रमाणे –
🥇 प्रथम क्रमांक – हलवाई चौक गणेश मित्र मंडळ, शिरूर
🥈 द्वितीय क्रमांक – डंबेनाला गणेश मित्र मंडळ, शिरूर
🥉 तृतीय क्रमांक – कापड बाजार गणेश मित्र मंडळ, शिरूर
उत्तेजनार्थ पुरस्कार –
📍 सुवर्णयुगचा राजा मित्र मंडळ, हुडको कॉलनी, शिरूर
📍 छत्रपती संभाजीनगर मित्र मंडळ, हुडको कॉलनी, शिरूर
📍 हनुमान गणेश मित्र मंडळ, मारुती आळी, शिरूर
📍अजिंक्यतारा गणेश मिञ मंडळ,शिरुर
सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या वेळी सुवर्णयुगचा राजा मित्र मंडळाचे अध्यक्ष शैलेश जाधव, उपाध्यक्ष शुभम पुजारी, तर छत्रपती संभाजीनगर मंडळाच्या मार्गदर्शिका शोभनाताई पाचंगे आणि सदस्य अजिंक्य तारु यांनी हा सन्मान स्वीकारला.
२०२४ वर्षीच्या विसर्जन मिरवणुकीत विशेष बाब म्हणजे हुडको वसाहतीतील दोन मंडळांनी ३४ वर्षांनंतर एकत्रित मिरवणूक काढत एकात्मतेचा संदेश दिला. एकाच ट्रॅक्टरवर दोन्ही मंडळांच्या मूर्ती आणि एकाच बँडचा वापर केल्याने शिरूरकरांना ऐतिहासिक दृश्य अनुभवायला मिळाले.
सामाजिक उपक्रमांची परंपरा कायम ठेवणाऱ्या छत्रपती संभाजीनगर मंडळाने समाजोपयोगी कार्य केले असून, सुवर्णयुगचा राजा मंडळाने विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांद्वारे समाजात सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. या सन्मानामुळे केवळ मंडळांचे नव्हे तर संपूर्ण हुडको कॉलनीचेही नाव उजळले आहे.
या गणराया ॲवार्ड २०२४ चे परिक्षण प्रा.सतिश धुमाळ,प्रा.विलास आंबेकर,डाॅ.रविन बोरा,रवींद्र सानप,प्रा.चंद्रकांत धापटे, ॲड.सुप्रिया साकोरे यांनी केले.
Social Plugin