Ticker

6/recent/ticker-posts

श्री नागनाथ विद्यामंदिर बुध चे शिष्यवृती परीक्षेत उज्ज्वल यश .

 




बुध   दि .[प्रकाश राजेघाटगे ]

 महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात 8वी शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयातील विद्यार्थी  विश्वजीत नाना दडस याने 272 गुण मिळवून राज्यात 13 वा व जिल्हयात  4 क्रमांक ग्रामीण मध्ये मिळवून श्री नागनाथ विद्यामंदिर बुधचे नाव लौकिक केले आहे . या परीक्षेत 11 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी 5 विद्यार्थी पात्र झाले . व 5वी चा एक विद्यार्थी पात्र झाला आहे . या सर्व गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार व अभिनंदन उपस्थित मान्यवर यांनी  केले . सातारा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व उपसरपंच अभयसिंह  राजेघाटगे , दैनिक प्रभातचे पत्रकार प्रकाश राजेघाटगे , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण , विद्यालयाचे प्राचार्य अंकुश भांगरे व विद्यालयातील सहकारी उपस्थित होते . 8वी मधील आदर्श रविंद्र जगदाळे , कु अंजली शशिकांत बागेकरी , कु श्वेता मुकूंद जगदाळे, व प्रणव आबासो गोडसे हे विद्यार्थी शिष्यवृती पात्र झाले तर 5वी चा विद्यार्थी आदर्श पांडूरंग बोराटे हा पात्र झाला .  अभयसिंह राजेघाटगे यांनी गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे कौतुक व अभिनंदन केले .तसेच सर्व विद्यार्थी व विद्यालयासाठी आवश्यक असणाऱ्या भौतिक , शैक्षणिक सुविधा देण्यात येतील . जिथे कमी तिथे आम्ही यासाठी सतत आम्ही प्रयत्न करू .

तसेच बुध ग्रामपंचायत व माजी विद्यार्थी यांच्या वतीने सहकार्य केले जाईल असे विचार  मांडले . उपस्थित मान्यवर यांचा प्राचार्य अंकुश भांगरे , पर्यवेक्षक नाना दडस व तानाजी पाटील यांनी स्वागत केले तसेच संजय पवार यांचे अभयसिंह राजेघाटगे यांनी स्वागत केले . यावेळी विद्यालयातील विद्यार्थिनी सानिका बोराटे व ऐश्वर्या बोराटे तसेच विद्यालयातील ग्रंथपाल नामदेव धनवडे यांना सर्व  मान्यवरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या . या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भगवान सरवदे यांनी केले तर आभार तानाजी पाटील यांनी मानले . या विद्यार्थ्यांना प्राचार्य अंकुश भांगरे यांच्या मार्गदर्शनाखील शिक्षक नाना दडस , नितीन नारागुडे , तानाजी पाटील , भगवान सरवदे, अंजली कचरे , नवनाथ दिगांबर , संताजी देसाई, सविता भांगरे व पल्लवी कुंभार यांनी मार्गदर्शन केले . सर्व यशस्वी विद्यार्थी , पालक ,शिक्षक शिक्षीका यांचे बुध व बुध पंचक्रोषी ग्रामस्थ , ग्रामपंचायात बुध सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, माता पालक संघ यांचे अभिनंदन केले .