तालुका प्रतिनिधी मारोती गाडगे/गेवराई
गेवराई (बीड), दि.३ पुरस्कार,शाब्बासकी, कौतुक मनुष्याच्या जीवनाला अधिक प्रोत्साहित करतात, प्रेरणा देतात. त्यातून आपल्या हातून पुढील काळात निश्चितच चांगले कार्य घडते. म्हणूनच नव्याने स्थापन झालेला रोटरी क्लब ऑफ गेवराई आणि कॅप्टन कृष्णकांत हायवे सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या सोमवारी शालांत परीक्षेतील गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकणार आहे . सोमवार दि. ७ जुलै रोजी पत्रकार भवनात सकाळी ११ वा . आयोजित या कार्यक्रमात दहावी व बारावी उत्तीर्ण गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करणार आहेत . ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी प्रवीण काळम पाटील आणि ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी भीमाशंकर नांदूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होत आहे. रोटरी क्लब ऑफ गेवराई स्थापन झाल्यापासून १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी करियर गाईडन्स मेळावा, कृषि दिनी वृक्षारोपण , डॉक्टर , शेतकरी व सनदी लेखापाल यांचा संयुक्त कृतज्ञता सोहळा, व्यापाऱ्यांना सी.ए .कडून मार्गदर्शन, जि .प .च्या ज्या प्राथमिक शाळेत संगणक नाही अशा शाळेला संगणक देण्याचे कार्य रोटरी क्लबने केले आहे .
विद्यार्थ्याना प्रेरणा मिळावी म्हणून ७ जुलै २०२५ रोजी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे . गेवराई शहरातील प्रत्येक माध्यमिक शाळेतील १० वी उत्तीर्ण पहिल्या गुणानुक्रमे ३ गुणवताधारक विद्यार्थ्यांचा तसेच शहरातील ज्युनियर कॉलेजमधील १२ वी उत्तीर्ण (कला वाणिज्य विज्ञान शाखा ) तिन्ही शाखेत मिळून पहिल्या ३ गुणवताधारक विद्यार्थाची पूर्ण नाव, गुण, टक्केवारी, संपर्क क्रमांक 9422744266,9850929098 व 9075009411 या क्रमांकावर मुख्याध्यापक , प्राचार्य यांनी पाठवून सहकार्य करावे . तसेच या कार्यक्रमास शहरातील शाळा - कॉलेजचे मुख्याध्यापक, प्राचार्य, विद्यार्थी, प्रतिष्ठित नागरिक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ गेवराईचे अध्यक्ष रो . प्रा . राजेंद्र बरकसे, सचिव रो . प्रविण जैन, प्रोजेक्ट चेअरमन रो . धर्मराज करपे, कॅप्टन कॅप्टन कृष्णकांत हायवे सर्व्हिसेसचे संचालक रो.गणेश कुलकर्णी, रोटरी क्लबचे जॉईंट सेक्रेटरी रो .डॉ . नागनाथ मोटे, रो . प्रा . रामलिंग गुळवे , रो . मनोज टाक यांनी केले आहे .
Social Plugin