बिलोली~ आमेटवार राजेश आबन्ना
बिलोली - तालुक्यातील हिप्परगा थडी येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोहरम सण साजरा करण्यात आला या मोहरमच्या निमित्ताने दि.०१/जुलै/२०२५ रोज मंगळवार रात्रभर पाऊस पडत होता या मुसळधार पावसात भक्तांनी रात्रभर नाचुन आपला आनंद साजरा केले. तसेच सवाल जवाब च्या चाली पण म्हटले गेले.गतवर्षी प्रमाणे या मुसळधार पावसामुळे नाटक, सोंग अश्या प्रकारचे कार्यक्रम झाले नाही. हि सवारी अली अब्बास ची असुन सर्व धर्मियांना गावातील हा सन म्हणजेच मोहरम हा मोठया उत्साहात साजरी झाला. दर वर्षी प्रमाणे यावर्षी देखील मोहरमानिमित्त हिप्परगा थडी येथे अनेक आजूबाजूचे गावातील नागरिक व भक्तगण तसेच तेलंगणा राज्यातील देखील लोक अलीआबास या वली वर भक्तीभावाने नागरिक येतात या निमित्ताने गावातील यात्राला मोठ्या प्रमाणात प्रचंड गर्दी जमा होऊन भांडणं तंटे आणि वादविवाद होऊ नये म्हणून गावातील सर्व युवा पिढी पुढाकार घेऊन हा सण साजरा करतात मग दि.०२/जुलै/२०२५ रोज मंगळवार पहाटे ०५:०० वाजता हि सवारी दर्गा सोडुन परंपरेनुसार गावातील घरोघर जाऊन त्यांच्या वचनानुसार काही कोडे काढतात या उत्सवामुळे गावातील लोकांना खुप आनंद होतो.हि सवारी संपूर्ण गाव फिरुन दुपारी ०१:०६ मि.त्याच्या दर्गामध्ये बसविण्यात आले.यामध्ये गावातील कार्यकर्ते तसेच सरपंच,पोलीस पाटील, माजी सरपंच,ग्रामपंचायत सदस्य, आजुबाजुच्या परिसरात, गावातील लोकांनी हा मोहरम मध्ये सामील होऊन हा मोहरम सन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.





Social Plugin