बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ] -
श्री नागनाथ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यामंदिर बुध मध्ये तंबाखूमुक्त बुध बीट स्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती . जिल्हा परिषद सातारा तसेच सलाम बॉम्बे फाउंडेशन मुंबई यांच्यावतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते .या कार्यशाळेसाठी खटाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी .सोनाली विभूते मॅडम, शिक्षणविस्तार अधिकारी अरुण पाटीला , शिवाजी कदम , केंद्रप्रमुख .संजय दिडके साहेब , अजित निकाळजे व नवनाथ गावडे तसेच सलाम बॉम्बे फांऊडेशन चे.रविंद्र पाटील सर उपस्थित होते . उपस्थित मान्यवर यांनी स्वामी विवेकानंद व शिक्षण महर्षी डॉ बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन केले .
विद्यालयाचे प्राचार्य मा .अंकुश भांगरे सर व पर्यवेक्षक नाना दडस यांनी मान्यवरांचे स्वागत गुलाब पुष्प व पुस्तक भेट देऊन केले . गटशिक्षणाधिकारी सोनाली विभूते यांनी कार्यशाळेला मार्गदर्शन केले तसे तसेच एक पेड माँ के नाम हा उपक्रम 100% पूर्ण करावा तसेच विविध उपक्रमाचा आढावा घेऊन कार्यशाळेस मार्गदर्शन केले . तसेच सलाम बॉम्बे फांऊडेशन मुंबईचे रविंद्र पाटील यांनी तंबाखूचे दुष्परिणाम व त्यामुळे होणारे आजार यासंदर्भात मार्गदर्शन केले . तंबाखूमुक्त होण्यासाठी समाजातील पालकांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे . तसेच तंबाखूमुक्त शाळा देखील झाली पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न गरजेचे आहे . समजातील युवक , प्रौढ व महिला या व्यासनाधिनतेपासून दुर राहण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे तरच समाज निकोप राहिल असे विचार मांडले तसेच सलाम बॉम्बे फाँऊडेशन करीत असलेले सामाजिक कार्याविषयी मार्गदर्शन केले . या कार्यशाळेसाठी राजापूर , वर्धनगड, ललगुण केंद्रातील माध्यमिक , जि.प शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान सरवदे यांनी केले तर आभार राजापूर केंद्राचे केंद्रप्रमुख अजित निकाळजे यांनी मानले व कार्यशाळा संपन्न झाली .
Social Plugin