प्रतिनिधी :-सागर इंगोले
तारीख 15 जुलै 2025 मुकुटबन गावात आर.सी.सी.पी.एल. युनिट मुकुटबन. ( बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड ) व सहयोगी संस्था "आम्ही आमच्या आरोग्यासाठी "संस्था कुरखेडा. जिल्हा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने. गरोदर मातांसाठी पोषण किट वाटप व आरोग्य तपासणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश गरोदर मातांना आवश्यक 'पोषक' घटक पुरविणे. त्यांचे आरोग्य सुधारणे व गर्भस्थ शिशुच्या आरोग्यास चालना देणे हा होता.
या कार्यक्रमांतर्गत एकूण 21 मतांनां पोषक कीट वाटप करण्यात आले. तसेच गरोदर मातांची हिमोग्लोबिन ची एच बी तपासणी करण्यात आली. या तपासणीतून मतांचे आरोग्य मूल्यांकन करून पुढील पोषन मार्गदर्शन दिले गेले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माननीय अनिल कुंटावार ( उपसरपंच )ग्रामपंचायत मुकुटबन . csr मॅनेजर धर्मेंद्र पात्रा (आर. सी.सी.पी.एल) माननीय विजय कांबळे सी एस आर मॅनेजर. (आर.सी.सी.पी.एल .) माननीय संदीप उरकुडे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी आर.सी.सी.पी.एल. उपस्थित होते. त्यांनी आरोग्यदायी प्रकल्प अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. व सामाजिक बांधिलकी जाणीव उपस्थितान पर्यंत पोहोचवली.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन आरोग्यताई प्रकल्पाचे समन्वयक श्री ज्ञानेश्वर घाटे, यांनी केले त्यांनी प्रस्ताविकात प्रकल्पाची संकल्पना उद्दिष्टे आणि पोषण किटच्या गरजेवर सविस्तर माहिती दिली. व त्यांनी नमूद केले की आरोग्य आहार व पोषण हे गरोदर मताच्या आणि त्यांच्या बाळाच्या आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे.
पोषण किटचा तपशील याप्रमाणे आहे.
प्रत्येक गरोदर मातेस मॉम चना शेंगदाणा मटकी वटाणा फुटाणा गूळ इत्यादी अन्नघटक असलेले पोषण किट वाटप करण्यात आले या किट मत या किट मधून प्रथिने लोह व इतर आवश्यक पोषणद्रव्य मिळून मतांच्या पोषण स्थितीत सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा आहे.
हा उपक्रम गावकऱ्यांमध्ये समाधान व विश्वास निर्माण करणारा ठरला असून अशा उपक्रमाद्वारे ग्रामीण भागातील मातृत्व व बालकांच्या आरोग्य संवर्धनाला निश्चितच चालना मिळणार आहे
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित पाहुण्यांनी गरोदर मातांची संवाद साधला त्यांच्या शंका समाधान केल्या आणि आहाराविषयी मार्गदर्शन दिले. यावेळी येथे उपस्थित मीनाताई प्रतीक्षा ताई विकास व इतर सहकाऱ्यांचे सहकार्य उल्लेखनीय ठरले.
Social Plugin