Ticker

6/recent/ticker-posts

बदलापुरात अनियमित, कमी दाबाने आणि गढूळ पाण्याचा होणारा पुरवठा या निषेधार्थ भव्य हंडा कळशी मोर्चा !



समस्या न सोडवल्यास अधिकाऱ्यांच्या खुर्च्या खाली करणार –वामन म्हात्रे 

ग्रामीण प्रतिनिधी/प्रसाद दिनकरराव: 

बदलापूर शहराच्या पूर्व व पश्चिम परिसरात नागरिकाना कमी दाबाने पाणी पुरवठा केला जातो त्यामुळे नागरीकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणी टंचाईच्या विरोधात संतप्त नागरीकांनी बुधवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणवर हंडा कळशी मोर्चा काढून प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.बदलापुरात अनियमित, कमी दाबाने आणि गढूळ पाण्याचा होणारा पुरवठामुळे या भागात पाणी समस्या निर्माण झाली आहे. पाणी टंचाई बाबत अनेकदा पालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या,आंदोलने केली आहेत. मात्र आश्वसना पलीकडे काहीच कार्यवाही होत नाही. त्यामुळे आज संतापलेल्या नागरिकांनी महिलांसह शिवसेना शिंदे गट यांच्या पुढाकाराने. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हंडा कळशी मोर्चा काढला. या मोर्चात हंडा कळशी घेऊन महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. आठ दिवसात समस्या सुटली नाहीतर उग्र आंदोलन करण्याचा इशारा मोर्चाचे नेतृत्व करणारे वामन म्हात्रे यांनी प्रशासनाला दिला आहे.

बदलापूरच्या तहानलेल्या जनतेचा संताप अखेर रस्त्यावर उतरला असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा (स्मारक), रमेशवाडी, बदलापूर पश्चिम येथून बेलवली मजीप्रा कार्यालयापर्यंत भव्य "हंडा-कळशी मोर्चा" काढण्यात आला. हातात रिकामे हंडे आणि कळश्या, डोळ्यात संतापाचे अश्रू, आणि ओठांवर एकच घोषणा "पाणी आमचं हक्काचं आहे  हा लढा फक्त पाण्यासाठी नाही, तर मुलभूत हक्कांसाठीचा लढा होता. शुद्ध, सुरक्षित आणि नियमित पाणी हवेच, कमी दाबाने येणारा पाणीपुरवठा थांबलाच पाहिजे, गढूळ पाण्याचा घाणेरडा प्रश्न कायमचा मिटवला गेला पाहिजेयासाठी अधिकाऱ्यांच्या दारात पोहोचून थेट जाब विचारला असून दरम्यान अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेत पाणीपुरवठा लवकरच सुरळीत केला जाईल, असे आश्वासन दिले असल्याचे वामन म्हात्रे यांनी सांगितले या आंदोलनात शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक, महिला आघाडी, युवा वर्ग आणि बदलापूरचे सामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आम्ही महायुती सरकार मध्ये आहोत अधिकारी व महायुतीतील नेत्यांचा समन्वय घडला तर बदलापूर मध्ये पाण्याची आणि विजेची समस्या उद्भवणार नाही अधिकाऱ्यांनी आम्हाला सकारात्मक उत्तरे दिली पालकमंत्री यांच्याशी संपर्क करून मजीप्रा जनरेटरच्या मागणीसाठी एक कोटी निधी मजूर करून देऊ व महावितरण आणि मजिप्राच्या अधिकाऱ्यांनी समस्या सोडवल्या नाही तर त्यांना त्यांच्या गावाला पाठवू –वामन म्हात्रे शिवसेना शिंदे गट शहर प्रमुख