Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र योग शिक्षक संघ जालना यांच्या वतीने योग शिक्षकाच्या विविध मागण्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन




अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ

महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे अध्यक्ष मनोज नीलपवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या जालना जिल्हाध्यक्षा गीता कोल्हे, उपाध्यक्ष स्वप्नजा तुपकर,सचिव गीता शंकरपल्ली,महाराष्ट्र योग शिक्षक संघ कोषाध्यक्ष बालकुमार चाटला,महासचिव शिल्पा शेलगावकर, देवानंदजी चित्राल,गजानन पुरी,परमेश्वर लहिरे, ज्योती चौधरी,वृक्षाली आचार्य,पुजा आर्या,संभाजी लंगोटे,भरत मुळे,विशाल आंबेकर,महानंदा बोराडे, महानंदा उंबरहंडे आदींच्या वतीने माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी अर्चना भोसले यांना योग शिक्षकांच्या मागण्याचे निवेदन देण्यात आले.

 या निवेदनात म्हटले आहे की जिल्हा परिषद आरोग्य विभागा अंतर्गत आरोग्यवर्धिनी केंद्र अंतर्गत कार्यरत योगशिक्षका मार्फत आरोग्य केंद्रावर चालू असलेले योगसत्र घेण्याचे कार्य पूर्वी प्रमाणे चालू ठेवण्यात यावे,काही तालुका आरोग्य अधिकारी यांच्या ऑफिसला जमा केलेले अहवाल गहाळ झाले आहे.अशा संबंधित अधिकारी यांची चौकशी करण्यात यावी.योग शिक्षकांना पुनर्नियुक्तीच्या ऑर्डर देण्यात याव्यात हरियाणा गुजरात प्रमाणे महाराष्ट्र तर योगआयोग स्थापन करावा,योगशिक्षकाचे रखडलेले मानधन तात्काळ आदा करावे,बुलढाणा,लातूर जिल्ह्याच्या धर्तीवर योग शिक्षकांना पुनर्नियुक्तीच्या ऑर्डर देण्यात येऊन योग शिक्षकांना पूर्ववत रुजू करून घेण्यात यावे,अशा आशियाचे निवेदन दिले असून योगशिक्षक हे ग्रामीण भागात जाऊन ग्रामीण भागातील लोकांना योगासने प्राणायाम,यांची प्रभावीपणे धडे देत असून अनेक गंभीर आजारावर योगसाधना कशी प्रभावी आहे हे योग शिक्षकांनी करून दाखविले आहे,अनेक लोकांच्या आजारावर योग साधना द्वारे अमुलाग्र बदल घडून आणला आहे,भारत देशाने जगाला योगाची मोठी देणगी दिलेली आहे परंतु त्याच भारत देशात आणि महाराष्ट्र राज्यात योगशिक्षकांनांवर उपासमारीची वेळ येणे म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे. जर योग शिक्षकाच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर लोकशाही मार्गाने आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण,करण्यात येईल असा इशारा निवेदनाच्या शेवटी देण्यात आला.जिल्हा आरोग्य अधिकारी अर्चना भोसले मॅडम यांनी योग शिक्षकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले.

 यावेळी गीता कोल्हे,बालकुमार चाटला,शिल्पा शेलगावकर,स्वप्नजा तुपकर,गीता शंकरपल्ली, देवानंद चित्राल,ज्योती चौधरी,गजानन पुरी, परमेश्वर लहिरे,संभाजी लंगोटे,वृक्षाली आचार्य, पूजा आर्या,विशाल आंबेकर,भरत मुळे,महानंदा बोराडे,निशा उंबरहंडे,जाधव,आदि योग शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते...