Ticker

6/recent/ticker-posts

भगवान महावीर चौकाचे व संयम कीर्ती स्तंभाचे लोकार्पण



अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ

अंबड येथे आचार्य विद्यासागर महाराज यांचा 58 व्या दिक्षा दिवसा निमित्ताने सकल जैन समाज अंबड यांच्या कडून अंबड जालना रोडवर भव्य 35 फुटांचे भगवान महावीर चौक व आचार्य विद्यासागर महाराज यांचे संयम कीर्ती स्तंभाचे लोकार्पण करण्यात आले.श्री भगवान महावीर मंदिर परिसरात अभिषेक पूजन व आचार्य विद्यासागर यांचे पूजन झाले या नंतर मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले मुनिश्री विरसागर महाराज यांचा द्वारे लिखीत भक्ती कैसे करे पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले नंतर मुनिश्री विरसागर महाराज यांचे प्रवचन झाले या प्रवनात आचार्य विद्यासागर महाराज यांचा जीवनातील अनेक प्रसंग सांगुन मुनिश्री ने त्यांचे कार्य सांगितले 

जसे जेलमधील कैदी व आदिवासी लोकांन साठी उघड्लेले हातकरघा जीव दये साठी गोशाळा मुलींचा शिक्षणासाठी प्रतिभास्थली इंडिया नही भारत बोलो भारतात हिंदी भाषेच महत्व इ कार्यक्रमासाठी यावेळी विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर जितेंद्र पापळकर,खासदार डॉ कल्याण काळे,माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे, भाजपा नेते देवीदास कुचे,उपविभागीय अधिकारी विजय चव्हाण,पोलीस उपअधिक्षक विशाल खांबे,न.प.मुख्याधिकारी मनोज उर्कीर्डे, भरतेशजी शहा उघोजक पुणे,अतुलजी शहा उघोजक पुणे,  अनिलजी छाबड उघोजक जालना, अजितजी इंगलवार उघोजक छ.संभाजीनगर व परीसरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते...