प्रतिनिधी : प्रमोद गवस
दोडामार्ग १६: हातावरचं पोट आणि शेतात राबणारे आई-वडील, पोटाला चिमटा काढून मुलांच्या भविष्यासाठी स्वप्न पाहणारे — हे चित्र अनेक ग्रामीण कुटुंबांमध्ये दिसून येतं. दोडामार्ग तालुक्यातील हेवाळे गावची सुकन्या अनुजा अनुजा देसाई हिने अशाच कठीण परिस्थितीतून ‘जेईई’ परीक्षेत देशात ५८८वा क्रमांक मिळवत आयआयटी दिल्लीमध्ये प्रवेश मिळवला आहे.
अनुजाचे आई-वडील शेतमजुरी करून घर चालवतात तर भाऊ गोव्यात खासगी कंपनीत काम करतो. पुढील शिक्षणासाठी सहा ते सात लाखांचा खर्च त्यांना झेपणारा नव्हता. पण तिच्या या यशाची बातमी खानयाळे गावचे सुपुत्र व उद्योजक आनंद शेटये यांच्या पर्यंत पोहोचताच त्यांनी पुढचे शिक्षण स्वतःच्या खांद्यावर घेण्याचा निर्णय घेतला.
संदीप देसाई (संपादक, कोकणसाद व माजी सरपंच, हेवाळे) यांच्या माध्यमातून आनंद शेटये यांनी देसाई कुटुंबाशी चर्चा केली आणि अनुजाच्या पदवीपर्यंतचा सर्व शिक्षणखर्च उचलण्याची जबाबदारी घेतली. यामुळे देसाई कुटुंबाच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.





Social Plugin