अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
जालना जिल्ह्यातील शेवटच्या कोपर्यात वडोंगराळ भागात असलेल्या व बदनापूर विधानसभा व जालना लोकसभा मतदार संघातीलसिरजगाव घाटी येथे आतापर्यंत कोणताच लोकप्रतिनिधी म्हणून खासदार फिरकलेनाही.त्यामुळे गावात खासदार यावा अशी आपेक्षा अनेक गावकर्यांची होती.तिच आपेक्षा नव्याने निवडून आलेले खासदार डॉ. कल्याण काळे हे आज सिरजगावयेथे येताच गावकर्यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी खासदार डॉ.कल्याण काळे यांनी गावातील समस्या व इतर घडामोडीबाबतगावकर्यांशी चर्चा केली.येथील गावकर्यांनी समस्या सांगतानाच ते म्हणाले की आमच्या गावात भारत स्वातंत्र्य झाल्यापासून यापुर्वीच्या खासदाराने फिरकूनही बघितले नसल्याचे सांगितले.तसेच गावातून यापुर्वीच्या माजी खासदारालाच निवडणुकीत लिड असल्याचे सांगितले.मात्र खासदार डॉ.कल्याण काळे यांनी याबाबत कुठलाही विचार न करता सिरसगावात भेट देवून येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
या वेळी मा.सभापती अंकुशराव शेळके,भगवान कदम,भानुदास घुगे,पांडुबाबा शेजुळ,रेवणनाथ मारोती कुबेर,साडु पाटील शेजुळ ,परमेश्वर दामोदर देवकर,नेताजी विठ्ठलराव शेजुळ,नारायण रामकिसन शेजुळ,श्रीमंत एकनाथ शेजुळ,देविदास साहेबराव पवार ,विश्वनाथ गंगाराम उगले आदि मान्यवर उपस्थित होते..
Social Plugin