( यशाची गौरवशाली परंपरा कायम )
बुध - दि .[प्रकाश राजेघाटगे ]
श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगाव या संस्थेचे श्री हनुमानगिरी हायस्कूल पुसेगाव मधील 7 विद्यार्थी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती ( इयत्ता 8 वी) परीक्षेत मोठे यश संपादन करून शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. गुणवत्तेबरोबर संस्कार जपणाऱ्या या शाळेत विद्यार्थी नेहमीच यश संपादन करत असतात. विविध शैक्षणिक उपक्रमाची व समाज उपयोगी उपक्रमांची रुजवणूक करणारी ही शाळा जिल्ह्यातील आदर्श शाळांमधील एक आहे. यावर्षी इयत्ता दहावी तसेच इयत्ता बारावी व अन्य स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. इयत्ता आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत या विद्यालयाचे सात विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.यापैकी राज्य गुणवत्ता यादीत कुमारी संयमी रणवरे ही चमकली आहे. तिला गणित विषयात 100पैकी 100 गुण प्राप्त असून तिच्याबरोबर कुमारी अस्मिता माळी हिला देखील 100 पैकी 100 गुण प्राप्त आहेत.
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी पुढील प्रमाणे ,संयमी रणवरे, अस्मिता माळी ,सर्वज्ञा शितोळे ,अमृता बंडी , समृध्दी देशमुख ,स्वराली शेटे ,अंकिता नलवडे या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.श्री.सुरेश जाधव , उपाध्यक्ष श्री. बाळासाहेब जाधव , सचिव श्री.मोहनराव जाधव , खजिनदार श्री.लक्ष्मणराव जाधव व सर्व संस्था पदाधिकारी तसेच गुणवत्ता वाढ प्रकल्प अधिकारी श्री.के.डी. पवार सर, माजी प्राचार्य श्री.डी.पी. शिंदे सर, श्री.एस .आर.पाटील सर , श्री. जयंतराव जाधव, प्राचार्य श्री.गोफणे सर व्होकेशनल विभाग प्रमुख प्राध्यापक जे. बी. जाधव, व पुसेगाव पंचक्रोशी ग्रामस्थ, पालक वर्ग तसेच सर्व सहकाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले. संस्थेच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा तसेच मार्गदर्शक शिक्षकांचा नुकताच विशेष सत्कार करण्यात आला.
Social Plugin