Ticker

6/recent/ticker-posts

अलिबाग फोटोग्राफर असोसिएशन च्या वतीने वृक्षारोपण


अलिबाग( रत्नाकर पाटील) 

कृषी दिनाचे औचित्य साधून रायगड फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर असोसिएशन च्या आवाहनानुसार जिल्हास्तरीय वृक्षारोपण कार्यक्रम एकाच दिवशी एकाच वेळी करण्याचे आयोजन केले होते. त्यानुसार अलिबाग फोटोग्राफर असोसिएशन तर्फे 1जुलै रोजी खंडाळे ग्रामपंचायत हद्दीतील सागाव क्रिकेट मैदान परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. चिकू, पेरू, सीताफळ, काजू अशा  प्रकारच्या 55 फळ झाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली. 

 या वृक्षरोपण कार्यक्रमाप्रसंगी खंडाळे ग्रामपंचायत सदस्या, रायगड फोटोग्राफर अँड व्हिडिओग्राफर्स असोसिएशन खजिनदार जितेंद्र मेहता, अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन चे अध्यक्ष तुषार थळे, सचिव विकास पाटील,  खजिनदार विवेक पाटील, सह कार्याध्यक्ष सुबोध घरत, सल्लागार सुरेश  खडपे,  सचिन आसराणी,विजय पाटील, गणेश जाधव,  वैभव शिंदे, योगेश सावंत,  निलेश दुदम, अमर मढवी, दिलीप राजभर, दीपेश पाटील, सात्विक पाटील,   रुचिता प्रणय भगत - खंडाळा ग्रामपंचायत सदस्य, प्रणय भगत, दीनानाथ पाटील, दीपक पाटील, माजी सदस्य अनिश पाटील, प्रशांत म्हात्रे, अमोल गायकवाड, रितेश ठाकूर, मयुरेश भगत, बंड्या पाटील, आज्ञा पाटील आदी  सागाव ग्रामस्थ या कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमास रोपे उपलब्ध करून देण्यात सामाजिक वनीकरणचे  विशेष योगदान लाभले.