देगलूर - प्रतिनिधी- जावेद अहेमद
बिलोली तालुक्यातील ग्राम आदमपूर येथील बाईलेक आणि सासर ग्राम एकलारा, ता.मुखेड येथील रहिवासी तथा देगलूर पोलीस स्टेशन कार्यालयातील कार्यरत महिला पोलीस नाईक सौ.शेख रिहाना महेबुबसाब(पती शेख सादक)यांची मंगळवार दि.८ जुलै रोजी नाईक पदावरून पोलीस हवालदार (जमादार) पदी पदोन्नती मिळाली आहे.
तत्कालीन २००७ साली नांदेड जिल्ह्य़ाचे पोलीस अधीक्षक डाॅ.रवींद्रकुमार सिंघल यांच्या कार्यकाळात शेख रिहाना यांची पोलीस शिपाई म्हणून निवड झाली होती.त्यानंतर पोलीस अंमलदार आदि काळात ही महिला गुन्हेगारांत 'लेडी सिंघम' म्हणून शेख यांनी आपला दबदबा कायम ठेवला.याचीच प्रचिती म्हणून सेवा जेष्ठतेनुसार बसत असलेल्या निकषावर नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी त्यांना पदोन्नतीचे आदेश नुकतेच जारी केले आहेत.देगलूर पश्चिम बीट अंमलदार(नाईक)पदावर तब्बल ५ वर्ष सेवा त्यांनी बजावलेली आहे.
त्याबद्दल देगलूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मारोती मुंडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्रू देवा पवार,पोलीस निरीक्षक गोपाळ सुर्यवंशी यांच्या हस्ते व सहकारी महिला तथा पुरूष पोलीस कर्मचारीवर्गांसमवेत खांद्यावरती पदोन्नती बँज लावण्यात आले.याबद्दल माजी सरपंच प्रभाकर पेंटे, अंबादास शिनगारे,शिवदास हालबुर्गे,अरविंद पेंटे,शंकर मालीपाटील,भाजपा बिलोली मंडळ अध्यक्ष मारोती राहिरे,जयराम भरगिरे,अगडमदास शिनगारे, साईनाथ चिंतले,सरपंच प्रतिनिधी दिलीप भुसावळे,कवी,गीतकार जाफर आदमपूरकर,पञकार काशिनाथ वाघमारे,राम हालबुर्गे, सरपंच प्रतिनिधी अरविंद वाघमारे तथा गावकरी यांनी शेख रिहाना यांचे अभिनंदन केले आहे.
Social Plugin