गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
कारंजा लाड तालुक्यामधील गाव प्रणव नगर तुळजापूर येथील दळणवळण रस्ता बनवून मिळणे बाबत सर्व प्रणव नगर रहिवाशीत्यांनी ग्रामपंचायत तुळजापूर येथील अध्यक्ष व सचिव यांना निवेदन सादर करण्यात आले आम्ही खालील नमूद रहिवाशी प्रणवनगर, मौजा तुळजापूर येथील रहिवाशी असून सन २०११ पासून निवासी लेआऊट आहे. सदरील वस्ती मध्ये मुख्य रस्ता पिंजर मार्गे अकोला राज्यमार्ग वरील तुळजापूर रस्ता हनुमान मंदिर पासून जातो. सदरील रस्ता हा मौज तुळजापूर येथील पान्धन रस्ता असून अत्यंत कच्चा आहे. सदरील परिसरात अनेक नवीन लेआऊट मंजूर झाले असून लोक वस्ती निर्माण धिन आहे तसेच निवाशी लोकवस्ती व शेतीकामासाठी कारंजा शहर व तुळजापूर येथील शेतकरी यांचे नियमित दळणवळण करण्यासाठी एकमेव रस्ता आहे.
, आम्ही प्रणव नगर तुळजापूर रहिवाशी मागील ४ वर्षांपासून निवासी असून पावसाळ्यामध्ये सदरील रस्ता मध्ये मोठ्या प्रमाणात चिखल होवून दळणवळण करण्यास त्रासदायक होते. सदरील पावसाळी ऋतूमध्ये आमच्या वस्तीतील लहान मुले यांना शाळेत जाताना चिखल तुडवत प्रवास करावा लागत आहे करिता आपणास विनंती करण्यात येते कि उपरोक्त बाबीचा विचार करून हनुमान मंदिर तुळजापूर रोड ते शिव मंदिर प्रणव नगर पर्यंत रस्त्याचे बांधकाम करून देण्यातयावी करिता सविनय निवेदन तुळजापूर येथील ग्राम विकास अध्यक्ष व सचिव यांना देण्यात आले.
Social Plugin