Ticker

6/recent/ticker-posts

राहू शाखेचे विकास कांबळे यांना सर्वोत्कृष्ट विकास अधिकारी पुरस्काराने सन्मानित



      दौंड प्रतिनिधी -कानिफनाथ मांडगे 

             दौंड ता.26 केडगाव ता.दौंड येथील विकास कांबळे यांना उत्कृष्ट विकास अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

              राहू ता . दौंड येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने दिला जाणारा सर्वोत्कृष्ट विकास अधिकारी पुरस्कार विकास कांबळे यांना बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या हस्ते नुकताच पुण्यात देण्यात आला. बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदरे यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

            उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे यांच्या वतीने अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे,उपाध्यक्ष सुनील चांदेरे ,संचालक प्रवीण शिंदे ,बँकेचे अधिकारी संजय शितोळे आदी मान्यवर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला .बँकेचे मा. अध्यक्ष विद्यामन संचालक रमेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक निबंध मिसाळ, निलेश थोरात रावसाहेब कामठे अविकाका हातवळणे,राजेंद्र खैरे ,सर्व विकास अधिकारी, शाखा अधिकारी, सेवक, सचिव सहकार्य यांच्या उपस्थितीत स्वीकारण्यात आला.कांबळे यांना मिळालेल्या पुरस्कारा बद्दल दौंड तालुक्यातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.