प्रतिनिधी: सागर इंगोले
झरी जामणी तालुक्यातील मुकुटबन हॆ मोठी बाजारपेठ म्हणून ओळख आहे. या मुकुटबन शहराच्या मेन रोडचे काम मागील वर्षांपासून ठप्प असल्याने या रोडच्या नालीचे काम काही दिवसापासून बंद पडलेले आहे. नालीचे काम अर्धवट झाल्याने ही नाली राजराजेश्वर मंदिर पर्यंत जाऊन काम रखडल्यामुळे त्या नालीचे दूषित पाणी एक वर्षांपासून रोडवरून सुसाट वाहतांना दिसत आहे.
सारखे एक वर्षांपासून रोडला मुरत असलेल्या पाण्यामुळे या रोड वरून येथील आर. सी. सी. पी. एल सिमेंट कंपनी व बी. एस. इसपात,, मायनिंग च्या कोळश्याचेओव्हरलोड वाहतूक याच रोडनी होत असल्याने राजेश्वर मंदिर परिसरा समोरील रोडला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. त्या रोडाच्या खड्याच्या दोन्हीही बाजूनी शुद्ध पाणी पिण्याचे आरो फिल्टर त्या रोडच्या दोन्हीही बाजूनी असल्याने गावातील त्या फिल्टर चे पाणी नेणाऱ्या सर्व नागरिकांना व मंदिरात जाणाऱ्या भाविकांना त्या दूषित पाण्यातून जावे लागत आहे. या नलिसंदर्भात गावकरी नागरिकांनी अनेकदा तक्रारी करून याकडे येथील ग्राम पंचायत चे दुर्लक्ष असतांना दिसत आहे.
Social Plugin