दौंड प्रतिनिधी.कानिफनाथ मांडगे
दौंड-केडगाव(बोरीपार्धी)काल ता.२७ एक मित्र एक वृक्ष या ग्रुपचा ११ वा वर्धापन दिन व ग्रुपच्या प्रेरणास्थान स्वर्गीय सौ मंगलबाई मुथा यांचा अकरावा पुण्यस्मृतिदिन शिवाजीराव जेधे इंग्लिश मिडीयम स्कूल बोरीपार्धी(ता.दौंड) येथे वृक्षारोपणाने साजरा करण्यात आला.यावेळी उपस्थित मान्यवर व शाळेच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते १००झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय श्री गणेश इंगळे साहेब, (अपर पोलीस अधीक्षक) म्हणून उपस्थित होते. ग्रुप चे आधारस्तंभ आदरणीय श्री सुगंधीलाल मुथा यांच्याहस्ते ग्रुपच्या वतीने त्यांचा एक वृक्ष देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी इंगळे साहेबांनी विद्यार्थ्यांना व ग्रुप सदस्यांना मार्गदर्शन केले .पक्ष्यांचा ज्यूसबार प्रोजेक्ट क्र.४ मध्ये जानेवारी मध्ये १००झाडे लावली होती व काल पुन्हा १००झाडे लावलेली आता तेथे २००झाडांचे पक्षाचे ज्युसबार तयार झाले आहे.झाडे ,झाडांचे फायदे विद्यार्थ्यांना दिलेला प्रोजेक्ट पाहून साहेबांनी एक मित्र एक वृक्ष या ग्रुपच्या कार्याचे कौतुक केले.
ग्रुप च्या माध्यमातून आतापर्यंत वेगवेगळ्या संकल्पना राबविण्यात आल्या या माध्यमातून आतापर्यंत 25हजार पेक्षा झाडं लावली आहेत व ती जगवली सुद्धा आहे हे ग्रुप चे वैशिष्ट्य आहे. एक मित्र एक वृक्ष दरवर्षी ग्रुप मधील सदस्यांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना सन्मानित करत असतो,तसा सन्मान या वर्षी सुद्धा केला गेला. अनुज पितळे हे सी ए परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नात देशामध्ये विसाव्या क्रमांकाने पास झाले श्रीनिवास खंडाळे हे बी. जे. मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पदवी घेऊन पास झाले त्याबद्दल त्या दोन्ही वृक्ष प्रेमिचा गणेश इंगळे साहेबांच्या(अप्पर पोलीस अधीक्षक) हस्ते वृक्ष व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तसेच शिरूर तालुक्यातील वृक्षप्रेमी उमेश रणदिवे त्यांचे वृक्षारोपणातील उल्लेखनीय कार्याबद्दल एक मित्र एक वृक्ष या ग्रुप कडून उमेश यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी शिवाजीराव जेधे इंग्लिश मिडीयम स्कूल चे शिक्षक,शिक्षका, विद्यार्थी वर्ग,पालक वर्ग,एक मित्र एक वृक्ष ग्रुप चे सर्व सदस्य, व्यापारी वर्ग, पत्रकार वर्ग इत्यादी उपस्थित होते.ही माहिती ग्रुप चे अध्यक्ष प्रशांत मुथा यांनी दिली.
Social Plugin