Ticker

6/recent/ticker-posts

अमानी ते पांगरी नवघरे गावानजीक असलेल्या पुलाची उंची वाढवा आ. अमोल मिटकरी विधानपरिषदेत आक्रमक



प्रतिनिधीजावेद धन्नू भवानीवाले

मालेगाव : गेल्या वीस वर्षापासून चार गावांना मुख्य जोडणारा लहानपुल हा जमीन दोस्त असल्याकारणाने आणि दोन सिंचन तलावाच्या मध्ये केंद्रबिंद असलेल्या लहान पुलांची उंची वाढवावी यासाठी गावकऱ्यांचा वीस वर्षांपासून संघर्ष चालू आहे. पावसाळा लागताच कधी आठ आठ तर कधी नऊ नऊ तास पाण्याच्या प्रवाहामुळे लघु व्यावसायिक, हातमाग व्यावसायिक, शाळकरी मुले, आरोग्य व्यवस्था व आणीबाणीचे संकट सर्वाना तासन तास उभे राहण्याचा सरीपाट गेल्या वीस वर्षापासून सुरू आहे.

          श्रावण मासानिमित्त असंख्य भाविकांचा फोज फाटा लाखों भाविकांची मंदियाळी या रस्त्याने श्री क्षेत्र तपोवन येथे प्रस्थान करत असताना पावसाळ्यामध्ये पाण्याचा प्रवाह जास्त प्रमाणात असला की भाविकांनाही जागच्या जागी पुलावरती तटकळत उभे राहावे लागत असे. वीस वर्षापासून कर्दनकाळ असलेल्या पूलाची उंची वाढवावी त्याला संरक्षण कठडे करावे अशी मागणी असताना यासाठी भागवत मापारी यांच्या पुढाकारातून तसेच विवेक गवळी यांच्या लेखी निवेदनाने आज पुरवणी मागणीमध्ये विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी हे आक्रमक झाल्याचे दिसून आले.

           सदर पुलाची उंची वाढवण्यासाठी गावकऱ्यांचा गेल्या कित्येक वर्षापासून गावकऱ्यांना संघर्ष करावा लागत असे पुल उंच वाढीसाठी अनेक वेळा गावातील विकास नवघरे, रामेश्वर नवघरे, गणेश नवघरे,दत्ता शिंदे,गजानन अशोक नवघरे,भोला नवघरे आदि नागरिकांनी सतत पाठपुरावा लोकप्रतिनिधी कडे सुरू ठेवल्याने अखेर कुठेतरी प्रश्न सुटण्याची वेळ आता जवळ आल्या कारणाने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.