बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
गावातील प्रत्येक ग्रामस्थांनी लोकसहभाग व श्रमदानांच्या माध्यमातून सार्वजनिक सुविधा प्रभावी वापरून आपल्या परिसराची स्वच्छता व प्लास्टिक मुक्तीची अंमलबजावणी करावी असे आवाहन श्री.राजेश इंगळे यांनी केले. कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सातारा जि. परिषदेच्या माध्यमातून पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत कार्यक्रम आयोजित केला होता. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर.पी.भोसले,रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद, प्रा.डॉ.संजय क्षीरसागर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.हनुमंत निमसे,श्री .मारुती बनसोडे इ.उपस्थित होते. पुढे आपल्या भाषणात श्री. इंगळे म्हणाले,'भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ या महत्वकांशी उपक्रमाची घोषणा केली आहे. या सर्वेक्षणामधून जनजागृती, वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतागृहे, कचरा व्यवस्थापन या गोष्टीवर भर दिला आहे.जनतेच्या सहभागावर आधारित मूल्यांकन अधिक महत्त्वाचं ठरणार आहे.
या सर्वेक्षणामधून कचरा वर्गीकरण, घनकचरा आणि सांडपाण्याचे व्यवस्थापन कसे केले जाते. तसेच डिजिटल या द्वारे माहिती संकलन ही उपक्रमात समाविष्ट करण्यात आलेली आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांना राष्ट्रीय स्तरावर पारितोषिक दिले जाणार आहे. याप्रसंगी विद्यार्थ्यांना "स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ "या मोबाईल ॲपच्या माध्यमातून फीडबॅक देण्याचे आवाहन केले. व स्वच्छतेचे महत्व सांगितले. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर.पी.भोसले म्हणाले ,स्वच्छता ही केवळ आरोग्याची गुरुकिल्ली असून ती आपल्या जीवनशैलीचा भाग आहे. स्वच्छ भारत मिशन मुळे गाव पातळीवर जनजागृती करून सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. स्वच्छतेचे संस्कार रुजविण्याचे कार्य केले पाहिजे. शासनाच्या अभियानात सर्व विद्यार्थीनी सहभागी झाले पाहिजे याविषयीचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.किरण कुंभार यांनी मानले .तर आभार प्रा.डॉ. हनुमंत निमसे यांनी मानले .कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्रा.एल.के. पवार, प्रा.श्रीमती एम. बी. सोनार, प्रा.पी.व्ही.गायकवाड प्रा. एस .आर .धोंगडे, प्रा. संतोष कोकरे इत्यादी उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Social Plugin