बुध दि [प्रकाश राजेघाटगे]
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ए.आय. तंत्रज्ञानामुळे जागतिक स्पर्धेत सक्षम होता येते असे प्रतिपादन प्रा.पी.व्ही.गायकवाड यांनी केले.कला व वाणिज्य महाविद्यालयात 'कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यशाळा प्रशिक्षण' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते.प्रसंगी व्यासपीठावर प्र. प्राचार्य डॉ आर.पी.भोसले उपस्थित होते.पुढे आपल्या भाषणात प्रा. गायकवाड म्हणाले महाविद्यालयात कृत्रिम बुद्धिमत्ता अभ्यासक्रम हा राबविण्यात येत आहे .या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवी क्षितिजे खुली होणार आहेत. याविषयीची माहिती दिली.
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर पी .भोसले म्हणाले ,'कृत्रिम बुद्धिमत्ता या अभ्यासक्रमातून करिअरच्या अमर्याद संधी बरोबर विद्यार्थ्यांना कौशल्य व तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळणार आहे .महाविद्यालयात तीस विद्यार्थ्यांची बॅच तयार करून प्रशिक्षण दिले जाणार आहे .तसेच रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या प्रेरणेतून व चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली या महत्वकांक्षी उपक्रमाची सुरुवात केलेली आहे. ए.आय. प्रशिक्षणाचे समन्वयक म्हणून वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.पी.व्ही.गायकवाड काम पाहत आहेत. त्याविषयीची माहिती विद्यार्थीना सांगितली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रा.डॉ.किरण कुंभार यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी , विद्यार्थीनी,प्राध्यापक उपस्थित होते.
Social Plugin