Ticker

6/recent/ticker-posts

रायगडच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदी ललिता दहीतुले यांची नियुक्ती



अलिबाग (रत्नाकर पाटील) 

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदावर ललिता दहीतुले-कावडे त्यांची नियुक्ती झाली आहे. आधीच्या शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांची बदली विभागीय मंडळ सहाय्यक संचालक रत्नागिरी येथे झाली आहे. याबाबतचे आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 3 जुलै 2025 रोजी निर्गमित केले आहेत.

तत्कालीन शिक्षण अधिकारी पुनीता गुरव त्यांची सरकारने बदली केल्यानंतर महिनाभरापासून शिक्षणाधिकारी पद यांचे रिक्त होते. पूर्णवेळ शिक्षणाधिकारी नसल्याने दैनंदिन कामाचा खोळंबा होत होता. आता पूर्ण वेळ  शिक्षणाधिकारी मिळाल्याने कामाचा निपटारा होण्यास मदत मिळणार आहे.

ललिता दहीतुले कावडे यांची बदली सुरुवातीला प्रशासकीय अधिकारी महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था, छत्रपती संभाजी नगर  येथे करण्यात आली होती. त्यानंतर सरकारने ललिता दहीतुले यांना रायगड शिक्षणाधिकारी प्राथमिक पदावर सुधारित  पदस्थापना दिली आहे.

....