अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
अंबड पोलीसांनी काळविट प्राण्याचे दोन शिंगे एकुण किंमत 50 हजार रुपये किंमतीचा मुद्देमालासह एका आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.सदर कार्यवाही आज दि११/०७/२०२५ रोजी दुपारी ०३ वाजेच्या सुमारास करण्यात आलेली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडुन मिळालेली अधिक माहिती अशी की,अंबड पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांना त्यांच्या गुप्तबातमीदारामार्फत माहिती मिळाली की,एका संशयीत इसमाच्या घरात काळविट प्राण्याचे शिगे आहेत अशी खात्रीलायक माहिती मिळाल्यावरुन सदरची पंच व वन विभागाचे आर.एफ.ओ. श्री.दौंड,वनपाल बी.एम.पाटील,वनरक्षक कपील शिंगणे,सुप्रिया फड यांना देऊन दोन पंच व वन विभागाचे वर नमुद अधिकारी कर्मचारी तसेच पो.उप.नि.आर.ई.काकड,पो.अंमलदार. राऊत,पो.अंमलदार देशमाने तसेच पोहेकॉ चव्हाण,महिला पोहेकॉ अलका केंद्रे,अंमलदार संजय क्षिरसागर,विनोद भानुसे,यंशवत मुढे असे पो.स्टे.च्या शासकिय वाहनाने रवाना होऊन मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी इसम नामे दादासाहेब रावसाहेब दिवटे रा.अंबड ता.अंबड जि.जालना याचे अंबड मधील म्हाडा कॉलनीतील राहते घरी जाऊन त्यांच्या घराची घरझडती पंचासमक्ष घेतली असता सदर इमसाच्या घरामध्ये काळविट प्राण्याचे दोन शिंगे किंमत 50,000/-रुपयांचे मिळुन आले त्यानंतर मिळुन आलेले दोन शिंगएका कापडी पिशवीमध्ये टाकुन जप्त करण्यात आले आहे.
सदर कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक श्री.अजयकुमार बन्सल,अप्पर पोलीस अधिक्षक आशिष नोपाणी,उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोडके,पो.उप.नि.आर.ई. काकड,पो.अंमलदार.राऊत,पो.अंमलदार.1660 देशमाने तसेच पोहेकॉ/1272 चव्हाण,मपोहेकॉ/1173 अलका केंद्रे,पो.अंमलदार/221संजय क्षिरसागर,विनोद भानुसे,यंशवत मुढे तसेच वनविभागाचे आर.एफ.ओ.श्री.दौंड,वनपाल बी.एम.पाटील,कपील शिंगणे, सुप्रिया फड वनरक्षक आदींनी ही कार्यवाही बजावली.
Social Plugin