रायगड प्रतिनिधी कैलासराजे घरत
रायगड जिह्यातील पेण तालुक्यातील खारपाडा(ठाकूरपाडा) येथील श्री स्वयंभू शिवमंदिर देवस्थान ट्रस्ट येथे आज पहिला श्रावणी सोमवार त्या निमित्ताने पत्रकार कैलासराजे घरत पत्नी सौ.मयुरी कैलास घरत यांनी श्री.स्वयंभू मंदिरात जाऊन मनोभावे भगवान महादेवाचे दर्शन घेतले. हे जागृत देवस्थान आहे भक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण करणारा. संकटकाळात भक्तांच्या हाकेला धावणारा अशी शंभू महादेवाची ख्याती आहे. हे ३५० वर्षे जुने अतिशय प्राचीन स्वयंभू देवस्थान असून मंदिराच्या गाभाऱ्यात स्वयंभू महादेवाची पिंड आणि मंदिराच्या बाहेरील पूर्वेकडील खडकावर १२ लहान शिवपिंडी आहेत. चार वर्षापूर्वीच मंदिराचा नव्याने जीर्णोद्धार करून
मुख्य गाभारा बाहेर नंदी महाराज बाहेर प्रशस्त असे सभामंडप पश्चिमेकडील व्हरांडा त्यात चौथऱ्यावर गणपती बाप्पाची सुबक संगमरवरी मूर्ती बाहेरील मुख्य प्रवेशद्वाराजवळ तुळशीवृंदावन मंदिराच्या पश्चिमेस धर्मशाळा आहे. त्यात हरिनाम सप्ताह धार्मिक कार्यक्रमावेळी जेवण सामान ठेवण्यासाठी वापर होतो.
चैत्र महिन्यात साडेतीन दिवसांचा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. नवरात्र उत्सवाच्या वेळी घट बसविले जातात. स्वयंभू महादेवाची प्रचिती बऱ्याच शिवभक्तांना आलेली आहे. खारपाडा पंचक्रोशीतील शिवभक्तांची स्वयंभू शंकरावर प्रचंड श्रद्धा असून दर सोमवारी शिवभक्त शिवशंकराच्या दर्शनासाठी येत असतात. महाशिवरात्री आणि श्रावणी सोमवारी येथे भक्तांची अलोट गर्दी पाहावायास मिळते. मंदिरात दर सोमवारी हरिपाठ असतो. त्यामुळे वातावरण आणि संपूर्ण मंदिर परिसर शिवमय होऊन जातो.महाशिवरात्रीला रात्री पालखी सोहळा साजरा केला जातो.
या मंदराला निसर्गरम्य असे वातावरण लाभले आहे. चारही बाजूंनी हिरवीगार झाडी आणि मंदिराच्या मागे पावसाळ्यात पाण्याचा ओढा ओसंडून वाहत असतो. रायगड, ठाणे, नवी मुंबई येथील अनेक भाविक देखील श्रद्धेने या मंदिरात येऊन श्री स्वयंभू शंकराच्या चरणी नतमस्तक होऊन आपले मनोरथ मागत असतात. श्री.स्वयंभू शंकर आपले मनोरथ नक्कीच पूर्ण करेल. या मंदिराला सर्वांनी एकदा अवश्य भेट द्या.
Social Plugin