भवाडा प्रतिनिधी, पी के गावीत
स्वदेश फाउंडेशनच्या सहकार्याने World youth skill day निमित्ताने स्वदेश ज्ञान मित्र आयोजित चला भविष्य घडवूया स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी. आणि क्रीडा क्षेत्रात करिअर संधी म्हणून प्रमुख मार्गदर्शक श्री. पवन आडवळे संस्थापक व मुख्य कार्यवाहक अतुल स्पोर्ट्स फाउंडेशन राष्ट्रीय क्रीडामंच व प्रशिक्षक महाराष्ट्र राज्य. ( मलखांब योगा एरियल स्पोर्ट्स जिम्रस्टिक्स )
यांचे ऑनलाईन व्याख्यान झाले. ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षा म्हटलं की मनामध्ये भीती वाटत असते. आणि ही भीती कशी दूर करता येईल. आणि त्या स्पर्धा परीक्षेला कसे समोर जायचं ते आडवळे सरांनी समजून सांगितले.
क्रीडा क्षेत्रामध्ये जास्त प्रमाणात ग्रामीण भागातील विद्यार्थी हा चांगला चमकताना दिसत असतो. पण त्यांना पुढे आर्थिक समस्यामुळे जाता येत नाही. अशा बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये नकारात्मक विचार असतात. ते कसे दूर होतील व त्यांची बांधणी कशी करायची हे देखील सांगितले.
नागेश्वर माध्यमिक विद्यालय भवाडा येथे, ऑनलाईन स्पर्धा परीक्षेचे नियोजन आमचे स्वदेश फाउंडेशनचे. प्रशिक्षक मुरली कासर सर यांनी केले. आणि ज्ञान मित्र म्हणून पुष्पराज गावित व भास्कर जाधव आणि मोलाचे सहकार्य नागेश्वर विद्यालयाचे प्रिन्सिपल वाघमारे सर, आणि बागुल सर व पवार सर यांनी केले.
Social Plugin