प्रमोद गवस/दोडामार्ग
दोडामार्ग (दि. १५ जुलै) : नगरोत्थान जिल्हास्तर योजनेतून दोडामार्ग बाजारपेठेतील जुनी सार्वजनिक विहीर नूतनीकरण व सुशोभीकरण करून लोकार्पण करण्यात आले. प्रभाग क्रमांक ११ व ८ मधील नागरिकांसाठी ही विहीर अत्यंत महत्त्वाची आहे. नगरसेवक नितीन मणेरीकर यांच्या पुढाकारातून ९ लाख ९९ हजार ७६२ रुपयांचा निधी खर्च करून हे काम पूर्ण झाले.
ज्येष्ठ नागरिक सूर्यकांत परमेकर यांच्या हस्ते पूजन व लोकार्पण झाले. नगराध्यक्ष चेतन चव्हाण, मुख्याधिकारी संकेत गायकवाड, उपनगराध्यक्ष देविदास गवस, माजी सरपंच प्रदीप चांदेलकर, नगरसेवक, महिलांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Social Plugin