Ticker

6/recent/ticker-posts

श्री सेवागिरी विद्यालयात कारगिल विजय दिवस संपन्न



बुध  दि .[ प्रकाश राजेघाटगे ]

 पुसेगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री सेवागिरी विद्यालयात शनिवारी कारगिल दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराज आजी माजी सैनिक संघटना चे अध्यक्ष व सभासद उपस्थित होते.  सुभेदार श्री अरुण जाधव यांनी 1999 साली झालेल्या कारगिल युद्धात भारतीय सैनिकांनी कशाप्रकारे पाकिस्तानच्या सैनिकांना लढा दिला याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती सांगितली व कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली व्यक्त करण्यात आली. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सावंत सर यांनी संघटनेच्या अध्यक्ष व सभासदांचे स्वागत करून आभार व्यक्त केले.