शिरुर ग्रामीण प्रतिनीधी - ( शैलेश जाधव)
"झाड वाचलं... घर वाचलं... पोपट वाचले!"
शिरुरच्या ज्येष्ठ पत्रकार ढोबळे यांची पर्यावरणप्रेमी भूमिका कौतुकास्पद शिरुर शहरातील ज्येष्ठ पत्रकार मुकुंद ढोबळे यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे तब्बल १०० ते २०० पोपट पक्षांचे जीव वाचले. शिरुर नगरपालिका शाळेमध्ये असलेले एक जुने झाड तोडण्यासाठी नगरपरिषदेचे कर्मचारी आले होते. मात्र, या झाडावर अनेक पोपटांचे घरटे असल्याचे लक्षात घेत पत्रकार ढोबळे यांनी तत्काळ हस्तक्षेप केला.
त्यांनी थेट शिरुर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रतिम पाटील यांच्याशी संपर्क साधून ही बाब निदर्शनास आणून दिली. ढोबळे यांचे पर्यावरणप्रेम आणि पक्षांप्रतीची हळहळ पाहून मुख्याधिकारी पाटील यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आणि झाड न तोडण्याचा निर्णय घेतला.
या झाडावर पोपट पक्ष्यांचा दाट वावर होता. यामुळे त्यांचे घर उद्ध्वस्त होण्याआधीच ते वाचवण्यात आले. ढोबळे यांच्या संवेदनशीलतेमुळे आज शिरुरमधील अनेकांनी त्यांचे मनःपूर्वक कौतुक केले."आज माणसं माणुसकी हरवत असताना, मुक्या जीवांसाठी उभे राहणारे मोजकेच... ढोबळे हे त्यातले एक"
Social Plugin