भवाडा प्रतिनिधी, पी के गावित
जिल्हा परिषद शाळा आणि नागेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 15 ऑगस्ट दिन साजरा करण्यात आला. त्या कार्यक्रमाला ग्रामपंचायतचे सरपंच कुसुमताई व उपसरपंच रामा महाले आणि आरोग्य विभागाचे माळी सर व त्यांचे कर्मचारी आणि अंगणवाडी सुशीलाताई तसेच ग्राम संघाच्या राधाताई, शिक्षण समितीचे अध्यक्ष सुरेश जाधव.
तसेच जिल्हा परिषद शाळेचे प्रा.पवार सर व त्यांचे सहकारी आणि नागेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रा. वाघमारे सर व त्यांचे सहकारी आणि गावातील युवाक्रांती मंडळाची टीम व ग्रामस्थांच्या मोठ्या संख्येने उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमांमध्ये मुलांनी देशभक्तीपर गीताच्या आधारे कवायत साजरीकरण केले.
जिल्हा परिषद च्या शाळेतील मुलींनी देशभक्तीपर गीतावर सामूहिक डान्स केला. दहावी इयत्ता मधल्या तालुक्यातून प्रथम आलेल्या ललित हंसराज जाधव यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उच्च माध्यमिक विद्यालयाचे हंसराज पवार यांना आदर्श शिक्षक म्हणून प्रमाणपत्र देण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
Social Plugin