बुध दि [प्रकाश राजेघाटगे ]
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संकल्प व संस्थापक शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांचा 38 वा स्मृतिदिन मोठ्या उत्साहातश्री नागनाथ विद्यामंदिर बुध मध्ये साजरा करण्यात आला .विद्यालाचे प्राचार्य श्री अंकुश भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मृतिदिन साजरा केला . यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण ,सेवानिवृत्त कलाशिक्षक हेमंत येवले ,पर्यवेक्षक नाना दडस व विद्यालयातील सर्व शिक्षक ,शिक्षीका , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी स्वामी विवेकानंद व बापूजी साळुंखे यांना अभिवादन केले .
विद्यालयाच्या वतीने चंद्रकांत चव्हाण व हेमंत येवले यांचा सत्कार नाना दडस व तानाजी पाटील यांनी केला .अर्णव फरकुटे , रिया जगदाळे ,आरोही व तन्वी पात्रेकर , मुस्कान मोमीन या विद्यार्थ्यांनी शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या कार्या आपले विचार मांडले व सर्वसामान्यांसाठी त्यांनी केलेले काम समाज कधी विसरणार नाही असे मत मांडले .चंद्रकांत चव्हाण यांनी सांगितले की ज्या ठिकाणी कसल्याही प्रकारच्या सोयी सुविधा नव्हत्या अशा ठिकाणी शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे खेड्या पाडयात, वाड्यावस्त्यावर जाऊन बहुजन समाजाला शिक्षणासाठी ज्ञानमंदिर सुरू केली .त्यामुळे सर्वसामान्य माणूस शिक्षणाच्या प्रवाहात आला .याचे सर्व श्रेय बापूजी साळुंखे यांना जाते .फुलाचा सुगंध कधी नष्ट होत नाही त्याप्रमाणे बापूजींनी दिलेले ज्ञान , विज्ञान आणि सुसंस्कार घेऊन संस्थेतील विद्यार्थी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या व जगाच्या विविध भागात पोहोचून त्यांचा सुगंध सगळीकडे दरवळत आहे असे विचार त्यांनी मांडले .डॉ .बापूजी साळुंखे व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांची भव्य मिरवणूक ढोल ताशा व झांज पथक वाद्यवृंद मध्ये मोठ्या उत्साहात बुध मधून भव्य मिरवणूक काढण्यात आली . विद्यालयातील सर्व विद्यार्थी यांनी अमर रहे अमर रहे ,बापूजी साळुंखे अमर रहे . ज्ञानाचा दिवा, घरोघरी लावा .स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचा ,विजय असो घोषणा दिल्या .यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थी , शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते .मोठ्या उत्साहामध्ये स्मृतिदिन साजरा करण्यात आला. या सर्व कार्यक्रमाचे
सूत्रसंचलन सहशिक्षक भगवान सरवदे यांनी केले तर आभार तानाजी पाटील यांनी मानले .
Social Plugin