लाखांदुर प्रतिनिधी :-
तालुक्यातील ग्रामपंचायत ओपारा अंतर्गत जिल्हा परीषदेच्या १५ वित्त आयोगाचे निधीतुन ओपारा येथील शिवाजी स्मारक मैंदानाला आवारभिंत बांधकाम मंजुर झाले असुन त्या सदर विकास कामाच्या बांधकामाचे भुमीपुजन आज दि. १८ आॅगस्ट रोज सोमवारला सकाळी १०.०० वाजे भुमिपुजन करण्यात आले. सदर भुमीपुजन सरपंचा पल्लवी राहुल राऊत, उद्योजक गणेश राऊत लाखांदुर यांचे हस्ते करण्यात आले तर त्यावेळी उपसरपंच उमेश राऊत ,सदस्याृशालू राऊत ,उषा राऊत ,वैष्णवी राऊत,ग्रामअधिकारी एम.टी.हेमने , राहुल राऊत पाटील, विद्याधर राऊत ,विजय राऊत , पुरुषोत्तम देव्हारे , प्रकाश राऊत यादी ग्रामस्थ उपस्थित होते.
Social Plugin