Ticker

6/recent/ticker-posts

मौजे आष्टी ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचारा विरोधात लढा सुरुच !



*विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाचा दहावा दिवस उपोषण कर्ता भगवान वाघमारे यांची प्रकृती ढासळली*


*शरीर जरी झिजलं,तरी पण लढा थांबणार नाही उपोषण कायम मरण पत्कारेंन पण माघार घेणार नाही*


अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ

 सर्वत्र ७९ स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असताना विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर या कार्यालयासमोर दि.११ ऑगस्ट रोजी पासून परतुर तालुक्यातील मौजे आष्टी ग्रामपंचात मधील भ्रष्टाचाराविरोधात गेल्या दहा दिवसापासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर भगवान रंगनाथ वाघमारे यांचे आमरण उपोषण सुरू असून विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे उपोषणाची दखल घ्यायला सोयसुतक वेळ नाही हे दुर्दैवी पणा म्हणावा लागेल.परतुर तालुक्यातील मोजे आष्टी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी डी.बी.काळे व सरपंच यांनी संगणमत करून १५ व्या वित्त आयोग,MREGS योजना अशा शासनाच्या वतीने विविध विकास योजनांमध्ये अफरातफर केला आणि काही विकास कामे कागदावरच तर काही कामे बोगस रित्या करून शासनाचा लाखो रुपयांच्या निधीचा गैरव्यवहार करत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद जालना यांना वारंवार पत्रव्यवहार व उपोषण ही केले चौकशी समिती च्या अधिकाऱ्यांकडून चौकशी झाली पण त्या चौकशीचा निकाल अजूनही मिळाला नाही.याचा अर्थ काय विकासाच्या नावाखाली गाव लुटलं जातंय आणि ते थांबवण्यासाठी झगडणारा भगवान रंगनाथ वाघमारे विभागीय आयुक्त कार्यालय समोर दहा दिवसापासून उपोषणाला बसलाय पण तरीही प्रशासनाच्या मनात जराही हालचाल नाही

.ग्रामपंचायत भ्रष्टाचाराच्या विरोधात गेल्या दहा दिवसांपासून एक आंदोलन कर्ता उपोषण करत आहे आता त्याची प्रकृती गंभीर होत चालली असतानाही संबंधित गेंड्याच्या कातडीचे अधिकारी मात्र धिम्म आहे.विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करणारा सर्व सामान्य माणूस भगवान रंगनाथ वाघमारे उपाशीपोटी लढतोय त्याची तब्येत ढासळली तरीही गेंड्याची कातडी पांघरलेले प्रशासनातील अधिकारी संवेदना शून्य झालेत अधिकारीला लोकांच्या वेदनांचाही आता त्यांना फरक पडत नाही खरंच लोकशाही आहे का ?अशा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडला आहे.या उपोषणकर्त्याची प्रशासनाने दखल घेऊन ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून त्या उपोषणकर्त्याला न्याय देण्यात यावा असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून उपस्थित होत आहे.