Ticker

6/recent/ticker-posts

अखिल भारतीय ग्राहक पंचायत जालना च्या वतीने गायरान जमिनी नियमानुकूल करणे बाबत उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन



अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ 

अखिल भारतीय ग्राहक पंचायत जालना जिल्हा यांच्या वतीने मौजे उक्कडगाव तालुका घनसावंगी येथील गट नंबर १८९ व १६० मधील गायरान जमिनीमध्ये १९७२ पासून रहिवासी असलेल्या नागरिकांना सर्वांसाठी घरे २०२२ या धोरणाअंतर्गत शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमणे रहिवासी वापरासाठी नियमानुकूल करणे बाबत माननीय उपविभागीय अधिकारी अंबड उपविभाग अंबड यांना निवेदन सादर करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की सदर रहिवाशी कुटुंबासाठी शासकीय घरकुल योजनेअंतर्गत मंजूर झाले आहेत परंतु स्थानिक प्रशासन ग्रामपंचायत सदर नागरिकांना आपली नावे भोगवट्यानुसार मालकी मध्ये नाहीत.त्यामुळे घरकुल मंजूर असूनही पुढील कार्यवाही करता येत नाही असे सांगितले आहे.ही अडचण घेऊन नागरिक ग्राहक पंचायत कडे आले होते.हे निवेदन माननीय उपविभागीय अधिकारी यांना देऊन त्याची प्रत गटविकास अधिकारी घनसांवगी यांना देण्यात आलेली आहे.या निवेदनावर भानुदास राघू वाहुळे, अर्जुन रामभाऊ अंभोरे,दिनकर आसाराम ठाकर, रामप्रसाद बाबुराव वाघमारे,रवींद्र लक्ष्मण धोत्रे, धोंडीराम उमाजी वाहुळे,पांडुरंग भगवान वाहुळे,व इतर नागरीकाच्या सह्या आहेत,आज दिनांक २० ऑगस्ट २०२५ रोजी सादर करण्यात आले,त्यावेळी उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे श्री शिरसाट साहेब आणि ग्राहक पंचायत जिल्हाध्यक्ष डॉक्टर रमेश तारगे,बाबासाहेब हेमके व इतर पदाधिकारी उपस्थित होते..