प्रतिनिधी- शौकत शेख
गायकवाड जळगाव आज गावामध्ये आढावा बैठक (ग्रामसभा) की मध्ये विविध कामावरती चर्चा करण्यात आली ग्रामपंचायत बालविवाह मुक्त करण्यासाठी संकल्प करून कार्यवाही करणे. वृक्ष लागवड कार्यक्रम २०२५.टी. बी. मुक्त ग्रामपंचायत अभियान राबविणे बाबत. घनकचरा विलगीकरण व सांडपाणी व्यवस्थापन याबाबत विद्यार्थी व नागरिकांमध्ये जनजागृती करने.आपले सहकार सेवा केंद्र कार्यान्वित करणे. विकसित महाराष्ट्र २०४७ बाबत अभिप्राय नागरिकांनी नोंदविणे.जल जीवन मिशन योजनेबाबत चर्चा करणे. घरकुल योजनेबाबत चर्चा करणे. ग्रामपंचायत कर वसुली बाबत चर्चा करणे. विविध विभागाच्या समित्या स्थापन करणे.
माननीय अध्यक्ष यांचा पूर्व परवानगीने एन वळी येणाऱ्या विषयावर चर्चा करणे तसेच सध्याचे काम चालू असतील हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे आणि जे काम अपूर्ण आहे ते कामे लवकर पूर्ण करण्यात यावे असे प्रस्ताव ग्रामसेवक राजेंद्र आहेर यांच्याकडे लेखी स्वरूपात या ग्रामसभेमध्ये देण्यात आले आहे तसेच या ग्रामसभेमध्ये पशुसंवर्धन. आरोग्य. कृषी विषयक. या विषयावर सविस्तर चर्चा करून गावाचा कसा सर्वांगीण विकास कसा होईल यावर बसून ग्रामसभेमध्ये ठराव एक मताने पास केला आहे ग्रामसभेमध्ये उपस्थित मान्यवर. बाबासाहेब अंधारे (तलाठी) ग्रामसेवक राजेंद्र आहेर. पशुसंवर्धन दत्तात्रेय पंडितराव भोसले. आरोग्य सेवक दगड खैर आदित्य. या सर्व मान्यवरांनी आपल्या क्षेत्रातील अनमोल माहिती या ग्रामसभेमध्ये प्रस्थापित केली आहे ग्रामपंचायत गायकवाड जळगाव. सरपंच. उपसरपंच. ग्रामपंचायत सदस्य. ग्रामपंचायत कार्यकारणी सदस्य. ग्रामपंचायत ऑपरेटर . जय केस भट ग्रामपंचायत सेवक दादासाहेब आगळे पाणीपुरवठा सदस्य ग्रामपंचायत. शेख अब्दुल भाई तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि ग्रामस्थ मंडळी यांच्या उपस्थितीत ग्रामसभा संपन्न झाली
Social Plugin