प्रतिनिधी :- तालूक्यातील सरांडी /बु. हे सैराट सामाजिक कार्यकर्त्यांनी भरलेले गाव असुन नियमित येथील ग्रामसभेत वादविवादातुन ग्राम विकासाचे निर्णय घेण्यात येत असल्याचे पाहावयास मिळत होते. माञ आज दि. १८ आॅगस्ट रोज सोमवारला माहे आॅगस्ट महीण्यात घेण्यात आलेल्र्या ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत शांततामय वातावरणात विषयसुचीनुसार ग्रामविकासात्मक विषय व ठराव घेण्यात आले.त्यानंतर शेवटचा विषय महात्मा गांधी तंटामुक्त समिती निवडीचा विषय घेण्यात आला असता
आधी पद्सिद्ध सदस्य व इतर सदस्य सरपंच अरविंद ठाकरे,उपसरपंच प्रभु ढोरे, ग्रामअधिकारी एम.डब्लु. भवसागर, धनजंय बुराडे,चैतराम कोटेकर,हेमराज तोंडरे,सुनिता घोरमोडे,पो.पा.अश्वीन बुराडे,पञकार ज्ञानेश्वर राऊत,विनोद दोनाडकर,मुरलीधर राऊत,मंदा मैंद,तारा रामटेके, गजानन बुराडे, शुभम बेदरे,देशमुख सर,लाईन मेन बागडे,पो.ज.सिंगनजुळे,तलाठी मेश्राम,सुरेश कवासे, तुलाराम ठाकरे अशा एकदंरीत एकवीस सदस्याची निवड झाल्यानंतर अध्यक्षपदासाठी चार व्यक्तीची नावे सुचविण्यात आली.त्यात संदीप रणदिवे,अशोक ठाकरे,चैतराम हटवार,राजेंद्र राऊत यांचेपैकी तिघांनी माघार घेत एकमताने ग्रामसभेने अशोक विश्वनाथ ठाकरे(सेवानिवृत्त पोष्ट मास्तर) अशा अनुभवपुर्ण व्यक्तीची तंटामुक्त अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यावेळी सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी,अधिकारी,कर्मचारी,नवनियुक्त तंटामुक्ती सदस्य व शेकडोच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
Social Plugin