Ticker

6/recent/ticker-posts

कारंजा येथे तिज ताेडणी व तिज विसर्जण कार्यक्रम संपन्न.



गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी 

कारंजा येथे दि.१७/०८/२०२५ ला तिज ताेडणीचा कार्यक्रम आदरणीय आमदार सईताई प्रकाशराव डहाके यांचे हस्ते महानायक वसंतराव नाईक सामाजीक सभागृह बंजारा काँलनी कारंजा येथे संपन्न झाले.यावेळी श्री जयकिसनभाऊ राठाेड माजी समाजकल्याण सभापती जि.प.वाशिम,प्रतिष्ठीत नागरीक,समाज बांधव,महिला भगिणी,तरूण,तरूणी बहुसंख्येंने तिज ताेडणी कार्यक्रमाला उपस्थित हाेते. तिज ताेडणी नंतर कारंजा शहरातुन दिव्य व भव्य मिरवणुकीचे/रँलीचे आयाेजन करण्यात आले हाेते.रथा साेबत दिव्य व भव्य ऐतिहासिक रँली/मिरवणुक काढण्यात आली,रँली मध्ये बंजारा समाजांच्या महिला,तरूणी आपल्या पारंपारीक पाेशाखात डफाच्या तालावर तिजचे गित गावुन चाैका चाैकात फेर धरतांना दिसत हाेते.पुरूषमंडळी त्यांना साद देतांना दिसत हाेते.चाैका चाैकात रँलीचे स्वागत हाेत हाेते.मिरवणुक मार्गात पिण्याच्या पाण्याची व नास्त्यांची तिजाेत्सव समिती व समाज बांधवांच्या वतीने चाेख व्यवस्था केली हाेती.शहरातील महामानवांच्या पुतळ्यांना हार टाकुन मानवंदना देण्यात येत हाेते.

रँली/मिरवणुक बंजारा काँलनी सभागृह पासुन ते पुढे टी पाईन्ट चाैक,महामानव वसंतराव नाईक चाैक एस टी स्टँड ,डाँ.बाबासाहेब आंबेडकर चाैक,जयस्तंभ चाैक,छ.शिवाजी महाराज चाैक,नेताजी सुभासचंद्र बाेस चाैक या मार्गाने काढण्यात आली.पुढे झाशी राणी चाैक बायपास येथे तिज मिरवणुकीचे समाराेप झाले.तिज विसर्जन इंझाेरी येथील अडाण धरणावरील पुलारून नदीत विसर्जन करण्यात आले.

शेवटी शेतकरी निवास कारंजा येथे मिरवणुकितील सर्व समाज बांधवांची/महिला भगीणी व तरूण,तरूणी करिता स्वरूची भाेजणांची चाेख व्यवस्था केली हाेती जवळपास ३५०० समाज बांधवांनी स्वरूची भाेजणाचा आस्वाद घेतला कार्यक्रम यस्वीतेकरिता कारंजा ताड्यांचे नायक,कारभारी,तसेच कारंजा नगरातील नायक कारभारी,तिजाेत्सव समितीचे अध्यक्ष श्री पी.डी.राठाेड त्यांची सर्व तिजाेत्सव समिती,प्रमुख मार्गदर्शक यांनी अथक प्रयत्न करून कार्यक्रम यशस्वी केले. या कार्यक्रमाला हजाराेच्या संख्येंने समाज बांधव उपस्थीत हाेते.