बाळापूर प्रतिनिधी : राजेश दामोदर :
दि ६ ऑगष्ट २५ शेगांव-अकोट महामार्गावरील लोहारा नदीवर सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचे संकेत समोर येत आहेत. स्थानिक नागरिकांच्या आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते, बांधकामात दर्जाचा अभाव दिसून येतो असून नियमांची पायमल्ली केली जात असल्याचा गंभीर आरोप केला जात आहे.
यासंदर्भात सुरक्षेचे निकष धाब्यावर बसवले जात असल्याचेही निदर्शनास येत आहे. ठेकेदार आणि बांधकामाशी संबंधित अधिकाऱ्यांमध्ये संगनमत असल्याचा आरोप करत जनतेमध्ये तीव्र असंतोष आणि संशयाची भावना आहे.
स्थानिकांनी यावर जिल्हा प्रशासन आणि लोकनिर्माण विभागाकडे तक्रारी केल्या असून, तपास आणि कारवाईची मागणी होत आहे. जर लवकरात लवकर कठोर पावले उचलली गेली नाहीत, तर हे बांधकाम भविष्यात प्राणघातक ठरू शकते, असा इशारा काही नागरिकांनी दिला आहे.
Social Plugin