बिलोली प्रतिनिधी गणेश कदम.
बिलोली तालुक्यातील अटकळी, आळंदी, आदमपूर व गळेगाव या परिसरात दिनांक 16, 17 व 18 ऑगस्ट रोजी झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शिवारामध्ये मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक शेतांमध्ये पाणी साचून राहिल्याने कापूस, सोयाबीन, उडीद, तूर आदी हंगामी पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी वर्ग हताश झाला आहे. या अनुषंगाने नुकसानाची वास्तविक स्थिती जाणून घेण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी सौ. पी.एम. काळे मॅडम, कृषी सहाय्यक कामठेवाड सर, कृषी खात्याचे कोकणे सर यांनी दौरा करून पाहणी केली. यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते दौलत चव्हाण, कैलास पोलकमवाड, राजेश पोलकमवाड, माधवराव कदम, आवराळे, बालाजी माधवराव पोलकमवाड तसेच पत्रकार गणेश कदम हे उपस्थित होते. पाहणी दरम्यान शेतकरी बांधवांनी पिकांच्या झालेल्या नुकसानीविषयी आपली व्यथा मांडली. अधिकारी व कृषी विभागाने प्रत्यक्ष शिवारात जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली असून शासनस्तरावर शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी अपेक्षा उपस्थित शेतकरी व ग्रामस्थांनी व्यक्त केली.
Social Plugin