●ग्रामीण प्रतिनिधी/महमदरफी मदार आदमपूरकर
●नांदेड-हैदराबाद महामार्गावरील बिलोली तालुक्यातील ग्राम शंकरनगर लगतच असणाऱ्या धुप्पा,ता.नायगांव येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सहशिक्षक बळवंत नागनाथराव पेंटे व लिपिक अशोक मारोतीराव मुंगडे तब्बल ३० वर्षाची सेवा करीत जुलै अखेरीस सेवानिवृत्त झाले होते.त्यांचा सेवापूर्ती सोहळा सोमवार दि.४ ऑगस्ट रोजी धुप्पा(शंकरनगर)संस्थेत साजरा करण्यात आला.
सदरील कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष तथा गाडगेबाबा समिती महाराष्ट्रचे पहिले अध्यक्ष माधवराव पाटील शेळगांवकर हे उपस्थित होते.प्रथमतः माता सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेस अभिवादन,मान्यवर सत्कार सोहळा,प्रास्ताविक,मानपञ वाचन,सहकारी कर्मचारीवर्गाचे मनोगत,मान्यवर गणगोतांचे मनोगत, सत्कारमूर्तींचा सपत्नीक सन्मान, सेवा अनुभव मनोगत शेवटी अध्यक्ष माधवराव पाटील शेळगांवकर यांन शैक्षणिक, सामाजिक,सांस्कृतिक, स्वच्छता,नातीगोती,संस्कार,वारसा,शिकवण आदि बाबींवर प्रकाश टाकत उद्बोधक मार्गदर्शन करीत मंञमुग्ध केले.
यावेळी समारंभास राज्याचे स्वच्छतादूत माधवराव पाटील शेळगांवकर,संस्थेचे सचिव तथा प्राचार्य संजय पाटील शेळगांवकर,उच्च माध्यमिक प्राचार्या सरोज पाटील शेळगांवकर,मुख्याध्यापक पाटील,शिवपुजे,अटकळे,विठ्ठल पाटील,माधवराव पाटील,गणपत पाटील,आनंदीदास महाजन, मधुकरराव कुलकर्णी,माजी सरपंच प्रभाकर पेंटे,अरविंद पेंटे,अंबादास शिनगारे,ग्रामविकास अधिकारी सूर्यकांत पेंटे,सोसायटी चेअरमन चंद्रकांत पाटील,रमेश पेंटे,मनू पेंटे,बाळासाहेब पेंटे,ञ्यंबक पेंटे,बालाजी चिगळे, काशिनाथ पेंटे,डाॅ.सचिन पेंटे,रणवीर चिगळे,विनोद पेंटे,आदमपूर उपसरपंच शंकरराव मालीपाटील,
सरपंच प्रतिनिधी संपत भुसावळे, निवृत्त बँक सहाय्यक फक्रूशा मदार, पञकार जाफर आदमपूरकर, पञकार काशिनाथ वाघमारे,पोलीस पाटील योगेश पेंटे, माणिकराव पेंटे,गोपीनाथ पेंटे,शिवराज पेंटे,विनोद पेंटे,योगेश पेंटे,
माणिकराव पाटील,काशिनाथ हांद्रे,रामराव चिंतले,रामदास पेंटे,नागनाथ पेंटे,हावगीराव मुंगडे,बसवंत बिद्राळे,
दिनकर कोळनुरे,बालाजी दंडे,श्रीराम चिगळे,
सुनील चिगळे,अनिल चिगळे,सुभाष काळे, सिदराम पाटील, अवकाश पाटील,पेंटे यांचे जावई, मुंगडे यांचे जावई,आप्तस्वकीय मिञ परिवार,ज्ञान संवर्धन शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग,आजी माजी विद्यार्थी, धुप्पा, शंकरनगर, आदमपूर,केसराळी, मुगांव,गौरी शेळगांव, अटकळी आदि परिसरातील कर्मचारी,नागरिक यांची उल्लेखनीय उपस्थिती होती.आभार धुप्पा काॅलेजच्या प्राचार्या सरोज पाटील शेळगांवकर यांनी मानले. कार्यक्रमानंतर सुग्रास भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
Social Plugin