बुध दि . [प्रकाश राजेघाटगे]
श्री नागनाथ विद्यामंदिर बुध चा माजी विद्यार्थी सागर नलवडे याने होतकरू 10 विद्यार्थ्यांना गणवेश दिले . गणवेशाचे वितरण सातारा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व उपसरपंच अभयसिंह राजेघाटगे,पत्रकार प्रकाश राजेघाटगे ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण व विद्यालयाचे प्राचार्य अंकुश भांगरे यांच्या हस्ते गणवेश देण्यात आले .विद्यालयातील सहशिक्षक श्री भगवान सरवदे यांनी माजी विद्यार्थी सागर नलवडे यास विद्यालयातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी गणवेशाची मागणी केली त्यास तात्काळ प्रतिसाद देत सहा हजार रुपये गणवेशासाठी पाठवून दिले . त्यामधून दहा विद्यार्थ्यांसाठी गणवेश मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये वाटप करण्यात आले .यावेळी अभयसिंह राजेघाटगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यालयाचे माजी विद्यार्थी व ग्रामस्थ विद्यार्थ्यांसाठी, विद्यालयासाठी नेहमी सहकार्य करत असतात त्यामधूनच सागर नलवडे यांनी प्रेरणा घेऊन एक स्तुत्य उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवला आहे त्याबद्दल त्याचे अभिनंदन केले .विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे . यावेळी आशिष संतोष अवघडे , प्रदीप विजय फडतरे ,विराज रोहिदास पवार ,सुखदेव संतोष पवार , अनुष्का गणेश चव्हाण ,राज सत्यजित ढाणे ,सोहम दत्तात्रय चव्हाण ,स्वरा अरविंद खरात, आरोही सागर खराटे , आदित्य सुनील रणसिंग या विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात आले .विद्यालयाचे प्राचार्य अंकुश भांगरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला .यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान सरवदे व आभार नाना दडस यांनी मानले . .
Social Plugin