Ticker

6/recent/ticker-posts

पर्यावरण पूर्वक राखी निर्मिती कार्यशाळा

 


बुध  दि [प्रकाश राजेघाटगे ]

 श्री भैरवनाथ हायस्कूल रणसिंगवाडी येथे पर्यावरण पूर्वक राखी निर्मिती कार्यशाळा  जय हिंद फाउंडेशनच्या आदरणीय हेमलता फडतरे  यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण पूरक अशा राख्या भैरवनाथ हायस्कूल मध्ये तयार करण्यात आल्या . या राख्यांसाठी रंगीत धागा ,भोपळा ,काकडी ,पपई च्या बिया यापासून पर्यावरण पूरक राख्या बनवण्यात आल्या. कालांतराने या विविध बियांपासून तयार केलेल्या राख्या जमिनीत पुरल्यानंतर त्यापासून पुन्हा नव्याने एक नवीन रोप तयार होते. आणि नवीन फळझाडांची निर्मिती होते .त्यामुळे अशा पर्यावरण पूरक राखी निर्मिती कार्यशाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे. तरुणांनाही लाजवेल अशा उत्साहाने हेमलता फडतरे  यांनीही कार्यशाळा घेतली आणि तितक्याच उत्साहाने मुलांनीही प्रतिसाद दिला आणि सुंदर सुंदर राख्या ची निर्मिती केली याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनीही भाग घेतला.